1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 मार्च 2020 (12:08 IST)

कोरोनामुळे सुबोध भावेला फटका

कोरोनाचा फटका सिनेइंडस्ट्रीलाही बसला आहे. यात केवळ हॉलिवूडच नाही तर मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचाही समावेश आहे. मिळालेल्या अपडेटनुसार, जम्मू-काश्मीरमधील सिनेमागृहे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. आता कलाकारांनाही आपले नियोजित कार्यक्रम पुढे ढकलावे लागत आहेत.  
 
बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत आहेत. आता मराठी सिनेसृष्टीवर त्याचा परिणाम होत आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता मराठी अभिनेता सुबोध भावेने आपला अमेरिकेचा दौरा रद्द केला आहे. सुबोधचे 'अश्रृंची झाली फुले' या नाटकाचे प्रयोग अमेरिकेत २७ मार्च ते २६ एप्रिलला होणार होते. परंतु, दौऱ्यात बदल केल्याची माहिती दिली आहे.