एसबीआयची फिक्स डिपॉझिटवरील व्याजदरात कपात
स्टेट बँक ऑफ इंडियाने फिक्स डिपॉझिटवरील व्याजदरात कपात केली आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा सबीआयकडून अशी कपात करण्यात आली आहे. ही व्याजदर कपात १० मार्चपासून लागू झाली आहे. एसबीआयने यापूर्वी १० फेब्रुवारीला फिक्स डिपॉझिटवरील व्याजदरात कपात केली होती.
सात दिवसांपासून ४५ दिवसापर्यंतच्या एफडीवर आता ४.५ टक्क्यांवरुन चार टक्के व्याज मिळणार आहे. एक ते पाच वर्षाच्या आतील एफडीवर आता ६ ऐवजी ५.९ टक्के व्याज मिळेल. पाच ते दहा वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर सहा ऐवजी ५.९ टक्के व्याज मिळणार आहे.
एफडीवरील व्याजदरात कपात करण्यात आली असली तरी, ज्येष्ठ नागरीकांना ५० पॉईंट जास्त व्याज मिळणार आहे. दोन कोटींपेक्षा कमी रक्कमेच्या फिक्स डिपॉझिटवर हे नवे व्याजदर लागू होणार आहेत.