मंगळवार, 1 एप्रिल 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जानेवारी 2021 (17:11 IST)

शेतातप्रॅक्टिस ते बेस्ट डान्सरचा मंच

महाराष्ट्राज बेस्ट डान्सरच्या मंचावर प्रेक्षकांना नृत्याचे विविध आविष्कार पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांनी आपल्या कलेचे उत्तम प्रदर्शन केले आहे. या सर्व स्पार्धकांमध्ये प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले आहे ते लातूरच्या दीपक हुलसुरे याने. लातूरच्या एका गावात राहणार्या दीपकला नृत्याची आवड आधीपासून होती, पण गावात कोणी गुरू नसल्याने यू ट्यूबवर व्हिडिओ पाहून त्याने डान्सला सुरुवात केली. ज्या शेतात दीपक काम करायचा, तिथेच तो सराव करू लागला. महाराष्ट्राज बेस्ट डान्सरमध्ये 12 जानेवारी रोजी, रात्री 9 वाजता लातूरच्या दीपकचा डान्स सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राज बेस्ट डान्सरच्या मंचामुळे दीपकला भारतसारखा गुरू मिळाला आणि त्याची कला अजून बहरू लागली.
 
मेहनत आणि जिद्द यांमुळे काहीही साध्य करता येते, हे दीपकने सगळ्यांना दाखवून दिले आहे. स्वतःचे डान्स स्कूल सुरू करायचे असे दीपकचे स्वप्न आहे आणि तो जेव्हा डान्स स्कूल सुरू करेल, तेव्हा धर्मेश सर त्याच्या डान्स स्कूलमध्ये शिकवतील, असा त्यांनी दीपकला शब्द दिला आहे. धर्मेश यांनी तर दीपकला डान्सचा लातूर पॅटर्न हे नावही दिले आहे. दीपक दिवसेंदिवस आपल्या नृत्याने प्रेक्षक आणि परीक्षक यांची मने जिंकत आहे.