रविवार, 5 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 ऑगस्ट 2024 (11:55 IST)

धडाकेबाज ‘फौजी’ १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात

fauji marathi movie will be release on 13 september
देशभक्तीने प्रेरीत अनेक चित्रपट  पडद्यावर येत असतात. त्यातल्या अनेकांना  प्रेक्षकांचाही  जोरदार पाठिंबा मिळत असतो. आपल्या प्राणांची  बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांप्रती आपलीही निष्ठा तेवढीच मोलाची असते. असाच एक  स्फूर्तीदायक मराठी चित्रपट ‘फौजी’ येत्या १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होत आहे. मातृपितृ फिल्म्स निर्मित घनशाम येडे प्रस्तुत ‘फौजी’चित्रपटात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शौर्याची स्फूर्तीदायक कथा पहायला मिळणार आहे. चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत दिमाखात प्रदर्शित करण्यात आला.
 
सीमेवरच्या जवानांची शौर्यकथा पोटतिडकीने मांडत, चैतन्य मराठे, भारत देशमुख या दोन जवानाचं आयुष्य आणि त्यांची निस्सीम देशसेवा यांच्यावर आधारलेल्या ‘फौजी’ चित्रपटात सौरभ गोखले, प्राजक्ता गायकवाड, अरुण नलावडे, नागेश भोसले, संजय खापरे, अश्विनी  कासार, शाहबाज  खान, टिनू वर्मा, सिद्वेश्वर झाडबुके, हंसराज जगताप, विवेक चाबुकस्वार, सुनील गोडबोले, रोहित चव्हाण, प्रग्या नयन, जान्हवी व्यास, कल्याणी नदकिशोर, मंजुषा खत्री, जयंत सावरकर, घनशाम येडे  या कलाकारांच्या भूमिका आहेत.  
 
चित्रपटाचे निर्माते-लेखक-दिग्दर्शक घनशाम विष्णुपंत येडे  असून सहनिर्मात्या सौ.स्वप्नजा विश्वनाथ नाथ आहेत. विशेष कार्यकारी निर्माता प्रथमेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, शिवाजी घमाजी दडस तर विशेष निर्मिती सहकार्य विष्णुपंतभाऊ नेवाळे यांचे आहे. अनमोल निर्मिती सहकार्य सतीश नाझरकर, डॉ. शंकर तलबे, उद्धव गावडे, अशोक गाढे, राजेश चव्हाण, गणेश गुंजाळ, एस.पी. गावडे, ज्योतीराम घाडगे, कुमार परदेशीं, राजेंद्र कर्णे , प्रविण बुरुंगे याचे आहे. 
 
शेतकरी कुटुंबातून आलेल्या आणि स्पॉटबॉय ते निर्माता-दिग्दर्शक असा संघर्षमय प्रवास करणाऱ्या घनशाम येडे यांनी ‘फौजी’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. 
 
चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते घनशाम येडे यांची आहेत. छायांकन मोहन वर्मा, तर संकलन विश्वजीत यांचे आहे. साहसदृश्ये मोजेस फर्नांडिस यांची आहेत. संगीत राजेश बामुगडे, बाबा चव्हाण, सूरज कुमार तर पार्श्ववसंगीत उमेश रावराणे, सूरज कुमार यांचे आहे. शान, वैशाली माडे, उर्मिला धनगर, कविता राम यांनी चित्रपटातील गाण्यांना स्वरसाज दिला आहे. ध्वनी अनिल निकम तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी वासू पाटील, कौशल सिंग यांनी सांभाळली आहे. रंगभूषा आमोद दोषी तर वेशभूषा नाशीर खान यांची आहे. निर्मिती प्रमुख महेश चाबुकस्वार तर वितरणाची जबाबदारी ए.ए फिल्म्सने सांभाळली आहे. 
 
 ‘फौजी’ मराठी चित्रपट १३ सप्टेंबरला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.