शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जुलै 2022 (07:44 IST)

अखेर अनिता दातेच्या या फोटोचे गुपित उलगडले

anita dete
सुमारे तीन वर्षांपूर्वी सुरु झालेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये आजही तितकीच लोकप्रिय वाटते आहे. या मालिकेतील राधिका ही व्यक्तिरेखा अभिनेत्री अनिता दाते हिने साकारली होती. या मालिकेतून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अनिता दाते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
 
झी मराठीवर लवकरच एका नव्या मालिकेची सुरुवात होणार आहे. नवा गडी नवं राज्य असे या मालिकेचे नाव आहे. या मालिकेद्वारे अनिता दाते पुन्हा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. अनिता दाते-केळकर ही एक मराठी अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनमध्ये काम करते. माझ्या नवऱ्याची बायको मधील राधिकाच्या भूमिकेसाठी तिला ओळखले जाते.
 
तिची जन्मतारीख ३१ ऑक्टोबर, १९८० सध्या वय ४२ वर्ष असून जन्मस्थळ नाशिक आहे. माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे अनिता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. त्यानंतर तिनं अनेक सिनेमातही काम केलं. काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘मी वसंतराव’ सिनेमात तिने वसंतरावांच्या आईची भूमिकी उत्तमरित्या वठवली. अनिता सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे अनेक फोटो व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या सगळ्या पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. मात्र अनिताने नुकत्याच केलेल्या एका पोस्टमुळे तिचे चाहते चांगलेच हैराण झाले आहेत. अनितानं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या फोटोला हार घातलेला दिसत आहे. हा फोटो पाहून अनेकांची झोप उडाली असून अनिता चक्क चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
 
या मालिकेत अनिता दातेचे पात्र या जगात नसल्याचे दाखवण्यात आले आहे. पण तरीही एका खोडकर भूमिकेतून ती पुन्हा एंट्री घेत आहे. घरावर राज्य असणाऱ्या एकीचा अर्धवट राहिलेला संसार पूर्ण करायला दुसऱ्या बायकोवर आलेलं राज्य म्हणून या मालिकेचं नाव ‘नवा गडी नवं राज्य’ आहे असे ठेवण्यात आले आहे.
 
या मालिकेतून एक आगळावेगळा विषय पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा एक नवा प्रोमो नुकतच प्रदर्शित करण्यात आला आहे. “जीव लावला की संसारातला प्रत्येक डाव जिंकता येतो, त्या दोघींच्या संसाराची एक गोड गोष्ट ” असे खास कॅप्शन या प्रोमोला देण्यात आले आहे.
 
यात अनिताच्या पात्राचे नाव रमा असे आहे. तर पल्लवी पाटील ही आनंदीची भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेत कश्यप परुळेकर, पल्लवी पाटील, वर्षा दांदळे हे कलाकारही पाहायला मिळत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी अनिताने या मालिकेशी संबंधित एक फोटो पोस्ट केला होता. यात तिच्या फोटोला हार घातल्याचे दिसून आले होते. तिचा हा फोटो पाहून अनेक चाहत्यांना तसेच कलाकारांना धक्का बसला होता. तिने हा फोटो शेअर करताना फार हटके कॅप्शन दिले होते. “जो आवडतो सर्वांना…” असे कॅप्शन अनिता दातेने दिले होते.