सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 सप्टेंबर 2022 (07:51 IST)

गौतमी पाटील वादग्रस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल

gautami patil
एक नवीन वादग्रस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे . यामध्ये गौतमी पाटील ही तरुणी बेभान होऊन नाचताना दिसत आहे. तिच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये ती लावणीच्या गाण्यांवर जरी थिरकताना दिसत असली तरी एकूणच सादरीकरणातील हावभाव पाहता त्या थिरकण्याला लावणी म्हणणे उचित ठरणार नाही. यावरून अनेक लोककला संवर्धक संघांनी तिला भेटून समज दिली आहे तर अनेक मराठी रोस्ट करणाऱ्या युट्युबर्सनी सुद्धा तिची चांगलीच शाळा घेतली आहे. हे नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात..
गौतमी पाटीलच्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?
 
गौतमी पाटीलचा व्हिडीओ पाहता तो सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावे आयोजित केलेला असावा हे दिसतेय. व्हायरल व्हिडिओमध्ये अगदी विचित्र हावभाव करून, अंगावर पाणी ओतून गौतमी नाचताना दिसत आहे.
 
हा व्हिडीओ वादातीत असला तरी तो तुफान व्हायरल होत आहे हे ही तितकंच खरं. मुख्य म्हणजे या व्हिडीओला शेकडो टीका केलेल्या असल्या तरी हजारो प्रेक्षक या व्हिडिओमध्ये गौतमीसह नाचतनाही दिसत आहेत. यामुळे फक्त नाचणाऱ्या गौतमीला टार्गेट केलं जावं की प्रेक्षकांनाही दोषी धरावं असा वाद ऑनलाईन दिसत आहेत.