गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 2 जानेवारी 2023 (15:04 IST)

गौतमी पाटील छेड काढणाऱ्या एका तरुणाला तिने धू धूतलंय

gautami patil
तरूणांमध्ये गौतमी पाटीलच्या डान्सची तुफान चर्चा आहे. सोशल मीडिया स्टार गौतमी पाटीलने खूप कमी कालावधीत  लोकप्रियता मिळवली आहे.तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला चाहते गर्दी करतात. मात्र अश्लील हावभाव आणि ड्रेसिंग स्टाईलमुळे ती नेहमीच ट्रोल होत असते. गौतमीच्या डान्सशिवाय तिचे काही बोल्ड फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या ना त्या कारणाने सतत चर्चेत येणाऱ्या गौतमीचा आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय. सांगलीतील एका कार्यक्रमात छेड काढणाऱ्या एका तरुणाला तिने धू धू धूतलंय.
 
सांगलीतील बेडग गावात तिचा कार्यक्रम होता. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे तुफान गर्दी हे ठरलेलंच आहे. दरम्यान एका तरुणाने तिची छेड काढायचा प्रयत्न केल्यावर गौतमीनेही दुर्गावतार घेत त्या मुलाला धू धू धुतले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यामध्ये तिने अक्षरश: चप्पल काढून त्याला मारल्याचे दिसत आहे. यानंतर तिचे सोबतचे तिला गर्दीतून सुरक्षित बाजूला नेत आहेत. मात्र छेड काढणाऱ्याची खैर नाही हेच गौतमीने या घटनेतून दाखवून दिले आहे. हा व्हिडिओ सध्याचा नसून काही महिन्यांपूर्वीचा असल्याचं सांगण्यात येत आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor