रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (17:02 IST)

कोल्हापुरात वाढदिवसाच्या दिवशी तरुणाचा दुर्देवी मृत्यू

death
कोल्हापुरात वाढदिवसाच्या दिवशी लगबग सुरु असताना हृदय विकाराचा झटका येऊन एका 25 वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रणव प्रकाश पाटील असे या तरुणचे नाव आहे. 

प्रणव हा कोल्हापुर तालुका करवीरच्या शिंगणापूर येथे राहायला होता. वडिलांच्या मृत्यू नंतर आजोळच्या मदतीने आईला धीर देत कमी वयातच अंगावर पडलेली कुटुंबाची जबाबदारी योग्य पद्धतीने हाताळली लग्न केलं आणि दीड वर्षांपूर्वी चंबुखडी परिसरात नवीन घर घेतले.बहिणीच्या लग्नाची तयारी सुरु केली .काळाने झडप घातली. प्रणवच्या 25 वा वाढदिवस साजरा करण्याची तयारी सुरु असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. .ज्या मित्रांनी आपल्या मोबाईलवर त्याच्या वाढदिवसाचं स्टेट्स लावत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या त्यांना अवघ्या काहीच तासात भावपूर्ण श्रद्धांजली स्टेट्स लावण्याची वेळ आली. 

प्रणव स्वभावाने मनमोकळा, निर्व्यसनी ,सर्वांचा मदतीला धावणारा, शांत आणि मेहनती मुलगा होता. त्याने वडिलांचे छत्र हरपल्यावर मेहनतीने सर्व संकटावर मात करवून शिक्षण पूर्ण करून फायनान्स कंपनीत नोकरी मिळवली आणि स्वकष्टाने घर घेतले आणि बहिणीच्या लग्नाची तयारी केली.

वाढदिवसाच्या दिवशीसकाळी त्याने ऑफिस मधून रजा घेतली आणि गुरुवारीच सकाळी त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याने रुग्णालयात जाऊन दाखवले, डॉक्टरांनी त्याला ईसीजी करण्यास सांगितले. ईसीजीचा रिपोर्ट नॉर्मल आल्यामुळे त्याला डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितले. घरी आल्यावर त्याने अराम केला आणि संध्याकाळी 4:30 वाजेच्या सुमारास त्याच्या छातीत कळ आली तो जागीच कोसळला.त्याला खाली पडलेले पाहून आई बहीण आणि पत्नी घाबरले आणि त्यांनी शेजारच्यांना बोलावले. त्यांनी प्रणवला तातडीने रुग्णालयात सीपीआर मध्ये दाखल केले. मात्र त्यापूर्वीच  त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 
Edited by - Priya Dixit