शनिवार, 8 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (11:56 IST)

बुरखाधारी महिलेचा खतरनाक बाइक स्टंट, व्हिडिओ व्हायल

burkha woman dangerous bike stunt
सोशल मीडियावर दररोज काही वेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशात राज्यातील भिवंडी येथून एका धोकादायक बाइक स्टंटचा व्हिडिओ समोर येत आहे. या व्हिडिओत बुरखा घातलेली एक महिला बाइकवर स्टंट करताना दिसत आहे. 
 
महिला मागे बसण्याऐवजी दुचाकीस्वाराच्या समोर टाकीवर बसलेली दिसत आहे आणि दुचाकीस्वार हायवेवर धावणाऱ्या इतर वाहनांना ओव्हरटेक करत पुढे जात आहे. या घटनेचा पाठीमागून धावणाऱ्या दुचाकीवर बसलेल्या तरुणाने व्हिडिओ रेकॉर्ड केला. 
 
व्हिडिओमध्ये दिसत आहे की व्हिडीओ शूट होत असल्याचे पाहून स्टंट करणारा दुचाकीस्वार थांबतो आणि व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाला धमकावतो. त्याला धमक्या दिल्याचीही व्हिडीओमध्ये रेकॉर्डिंग आहे. 
 
आता हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दुचाकीस्वार आणि तरुणीवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहे.