मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (07:38 IST)

आरोग्य विद्यापीठात अविष्कार - 2022 आंतरविद्यापीठ संशोधन महोत्सव स्पर्धेत 46 स्पर्धेकांना पारितोषिक

Innovation in Health University - 46 Competitors Awarded in 2022 Inter-University Research Festival Competition
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ’अविष्कार -2022’ आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेतील विविध गटातील विजेते 46 स्पर्धकांना  कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त)   प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
 
अविष्कार - 2022 विद्यापीठ स्तरीय संशोधन स्पर्धेत मानव्यविद्या भाषा व ललीतकला, वाणिज्य, व्यवस्थापन व विधी, विज्ञान, शेती आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यक व औषध निर्माणशास्त्र या सहा संवर्गामध्ये एकूण 52 महाविद्यालयातील 282 विद्यार्थी व शिक्षकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत पदवीपूर्व (युजी)चे 152, पदव्युत्तर पदवी (पीजी) चे 102, निष्णात (पदव्युत्तर एम.फिल, पीएच.डी) व शिक्षक(टिचर)चे 28 स्पर्धक सहभागी होते अशा प्रत्येक संवर्गातून सहभागी स्पर्धकांनी आपले संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण केले. परीक्षाणाअंती विविध गटातील एकूण 46 स्पर्धेकांची प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले.
 
विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, स्पर्धेच्या माध्यमातून संशोधकांना नवीन संशोधन कल्पनेला चालना मिळते. स्पर्धकांना विविध विषयातील संशोधन प्रकल्प प्रत्यक्ष पहाता येतात त्याचा त्यांना संशोधन कार्यात उपयोग करता येतो. विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती व उत्साह कौतुकास्पद आहे. समाजोपयोगी व जागतिकस्तरावर नावलौकिक होईल असे संशोधन कार्य विद्यार्थ्यांनी करावे असे त्यांनी सांगितले.
 
विद्यापीठाचे प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, आविष्कार- 2022 मध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प खरोखर कौतुकास्पद आहेत. विद्यार्थ्यांनी करमणुकीत फारसे न गुंतता संशोधनावर लक्ष द्यायला हवे. विद्यार्थ्यांनी विशिष्ट ध्येयाने प्रेरीत होऊन काम करायला हवे. प्रत्येक विद्यार्थ्याने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील अभिनव कल्पना घेऊन संशोधन कार्यात सहभाग वाहून घेतले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
 
 याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यार्थी हा विद्यापीठाचा केंद्रबिंदु आहे. संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठाडून विविध उपक्रम राबविण्यात येतात तसेच याकरीता आर्थिक मदत करण्यात येते याची माहिती सर्वानी घ्यावी. विद्यार्थ्यांची जिज्ञासू वृत्ती वाढीस लागावी यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. सामाजिक आरोग्यासाठी आपले संशोधन महत्वपूर्ण ठरेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले.
 Edited by: Ratnadeep Ranshoor