शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 9 जून 2022 (00:16 IST)

हृता दुर्गुळे चा विक्रम

अभिनेत्री हृता दुर्गुळे ही नेहमी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. या अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर नुकतेच २.5 मिलियन फालोअर्सपूर्ण करून विक्रम केलं आहे. तिने यावर आपल्या फॅन्सला धन्यवाद देऊन त्यांचे आभार मानले आहे. अशी कामगिरी करणारी ही पहिली मराठी अभिनेत्री ठरली आहे. अभिनेत्री हृता हिने इंस्टाग्राम वर आपल्या चाहत्यांना म्हटले आहे की आपल्या दिलेल्या प्रेमामुळे मला २.५ मिलियन चा टप्पा गाठणे शक्य झाले. आपण दिलेल्या प्रेमासाठी मी मनापासून आभारी आहे. अभिनेत्रीचा चाहता वर्ग मोठा आहे. हृताने आता 25 लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. सर्वात जास्त फोलअर्स असलेली हृता ही मराठी मनोरंजनसृष्टीतली पहिलीच अभिनेत्री आहे. हृताचे चाहते सोशल मीडिया पोस्ट शेअर करत हृताचे अभिनंदन करत आहेत. हृता मराठी अभिनेत्रींमध्ये इंस्टाग्रामवर टॉपर ठरली आहे. 
 
फुलपाखरू मालिकेने हृताला ओळख मिळवून दिली. सध्या हृता ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हृता दुर्गुळे नुकतीच प्रतीक शाहसोबत लग्नबंधनात अडकली आहे. हृता दुर्गुळेला महाराष्ट्राची क्रश असे म्हटले जाते.