गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (15:26 IST)

हृता दुर्गुळेचा लवकरच साखरपुडा होणार?

मन उडू उडू झालं सध्या ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या मालिकेत दिपू ची भूमिका साकारणारी हृता दुर्गुळे ही नेहमी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते . काही दिवसांपूर्वी हिने दिग्दर्शक प्रतीक शाह यांच्या सह नात्यात असल्याचे  जाहीर केले होते . प्रतिक शाह हा देखील सिनेमा आणि टीव्ही विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो.  ती नेहमी सोशल मीडिया वर  त्याचे आणि प्रतीकचे फोटो देखील शेअर करत असते . आता हृता आणि प्रतीक यांचा साखरपुडा येत्या 25 डिसेंबर रोजी असण्याची बातमी खुद्द हृता हिने सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. तिने सोशल मीडियावर प्रतीकसह असलेला एक फोटो टाकत लिहिले आहे की मी किती भाग्यवान आहे .! त्यासाठी  तुझे मनापासून आभार ...' असे म्हणत तिने प्रतीकला हॅश टॅग केले आहे .आता तिचा साखरपुडयाचे वेध तिच्या चाहत्यांना लागले आहे .