गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (07:26 IST)

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १४ डिसेंबरपासून

पंधराव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा (KVIFF)चे यंदा प्रथमच ऑनलाईन पद्धतीने १४ ते १७ डिसेंबर या कालावधीमध्ये प्रसारण होणार आहे. या महोत्सवाच्या बोधचिन्हाचे मंगळवारी (दि. ०७) अनावरण नाशिक शहरातील किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेडचे परेशकुमार जोशी (प्लांट हेड), उदय बक्षी (जनरल मॅनेजर), राहुल बोरसे (एच.आर. हेड), अंकित जैन (ए.जी.एम.), वीरेंद्र चित्राव (महोत्सव संयोजक) यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.  गेल्या १४ वर्षांपासून किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब यांनी सुरु केलेल्या या महोत्सवाचा यंदाचा विषय सकस अन्न , समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज असा असून पर्यावरणाशी निगडित चित्रपट प्रसारित करण्याबरोबरच वन्यजीवन, ऊर्जा, हवा, पाणी आणि पर्यावरण यांच्या अनुषंगाने चालणारे विविध उपक्रम व चित्रपट यांना स्थान देणारा हा एकमेवाद्वितीय असा महोत्सव आहे.
 
समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज यांचे परस्परावलंबी नाते लक्षणीय संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. संपूर्ण जगभरात सर्व स्तरांतील , सर्व प्रकारच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी महोत्सवाची ही बदललेली रचना कामी येईल . यामुळे प्रत्येक व्यक्तीमागचा ' कार्बन फुटप्रिंट ' कमी होईल अशी अपेक्षा आहे . यामुळे सकस अन्न , समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज हा विषय यंदाच्या महोत्सवासाठी निवडला आहे. हा महोत्सव म्हणजे निसर्गाला जाणून घेण्याचा आणि पर्यावरणाशी निगडित विविध समस्यांचा प्रश्नांचा आणि पैलूंचा अभ्यास व विश्लेषण करण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे. आपला अमूल्य निसर्गवारसा जतन करण्यासाठी प्रभावी आणि अर्थपूर्ण संवाद व देवाणघेवाणीसाठी एक सामाईक व्यासपीठ उन्नत करण्याची संधी हा चित्रपट महोत्सव आपल्याला बहाल करतो.
 
७ राज्यांतील ३० शहरांमधून आजतागायत २५० पेक्षा जास्त महोत्सव आयोजित करण्यात आले असून कोरोना महामारीच्या ह्या आव्हानात्मक परिस्थितीचे रूपांतर बदल घडवून आणण्याच्या संधीत करण्याच्या उद्देशाने किर्लोस्कर वसुंधरा हा १५ वा जागतिक आणि ऑनलाइन महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.
 
महोत्सवाची वैशिष्ट्ये :
* या वर्षीचा महोत्सव ४ दिवसांचा असेल : (१४ ते १७ डिसेंबर) दररोज ४.३० तासांचे प्रक्षेपण असेल.
रोजचे प्रक्षेपण सकाळी ११ ते दुपारी ३.३० (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
रोजचे पुनर्प्रक्षेपण सायं . ६ ते रात्री १०.३० (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
* आपण खातो ते अन्न, भोवतालच्या निसर्गाचे आरोग्य आणि निरोगी समाज यांचं एकमेकांशी असलेलं नातं विज्ञानानं ओळखलं आहे.
* या वर्षीच्या ऑनलाइन महोत्सवात, उद्घाटन समारंभ, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, वसुंधरा सन्मान (५ जणांना), कार्यशाळा, पॉडकास्ट, चर्चासत्रे, निसर्गसंवाद, चित्रपट, दृक्श्राव्य व्याख्याने आणि समारोप समारंभ इ.
* जगभरातील श्रोत्यांसाठी किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ऑनलाइन प्रसारित केला जाणार आहे.
* 'किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'ने डॉ. गुरुदास नूलकर, डॉ. राजश्री जोशी, स्वप्नील कुंभोजकर, आरती कुलकर्णी, डॉ. मंदार दातार, अनिरुद्ध चावजी, डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली ७० नवीन चित्रफिती तयार केल्या आहेत.
* BAIF , Down to earth आणि Go Wild हे महोत्सवाचे Knowledge Partners आहेत.
* फक्त नावनोंदणी करून या महोत्सवात तुम्ही सहभागी होऊ शकता. पुढील लिंकद्वारा नोंदणी करून आपण संपूर्ण महोत्सवात सहभागी होऊ शकता https://bit.ly/kviff2021
* अधिक माहितीसाठी संपर्क
परेशकुमार जोशी 7774008694 [email protected]
राहुल बोरसे 7796655162 [email protected]