गुरूवार, 1 डिसेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified शनिवार, 4 डिसेंबर 2021 (12:46 IST)

अभिनेत्री सायली संजीवला पितृशोक

मराठी सिनेसृष्टीतली नावाजलेली अभिनेत्री सायली संजीवच्या वडिलांच्या निधनाबद्दल स्वतः सायलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. गेल्या महिन्यात ३० नोव्हेंबरला सायलीच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू होते. वडिलांच्या मृत्यूची बातमी देताना सायली त्यांच्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले. यासोबतच तिने लिहिले की, 'संजीव २६/७/१९५८ - ३०/११/२०२१. तुला माहीत आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल. या जगात सगळ्यात जास्त तू आयुष्य आहेस माझं.'
 
यानंतर सायलीने वेन्टिलेटर सिनेमातील बाबा गाण्यातील काही ओळीही लिहिल्या.