मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (16:36 IST)

मराठी अभिनेत्रीकडून प्रोडक्शन कंट्रोलरने शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप

स्टार प्रवाह वाहिनीवरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेची चर्चा एका वेगळ्या कारणामुळे होत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी या मालिकेचे निर्माते व सहकलाकारांवर मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली होती. आता आणखी एका अभिनेत्रीने मालिकेच्या प्रॉडक्शन कंट्रोलरविरोधात एफआयआर दाखल केला आहे. 
 
अभिनेत्री स्वाती भाडवेने मालिकेच्या प्रोडक्शन कंट्रोलरवर गंभीर आरोप केले आहे. अभिनेत्री स्वाती भदवेने प्रॉडक्शन कंट्रोलर स्वप्नील लोखंडे विरोधात गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने या प्रकरणानंतर टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे.
 
अभिनेत्रीने प्रोडक्शन कंट्रोलरने शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. स्वाती मालिकेत नंदीता पाटकरची बॉडी डबल म्हणुन काम करते. तेव्हा प्रोडक्शन कंट्रोलरने माझ्यासोबत शारिरीक संबंध बदल्यात काम देईन असं त्यांनी सांगितलं. तिला मान्य नसल्यामुळे तिने नकार दिला असला तरी हा प्रकार खूप धक्कादायक असल्याचा खुलासाही अभिनेत्रीने केला आहे.
 
अभिनेत्रीने म्हटले की मी खूप वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत असून या मालिकेत नंदिता सेटवर नसल्यास किंवा तिला उशीर होत असल्याच तिची भूमिका मी साकारायचे. परंतु एक दिवस प्रॉडक्शन कंट्रोलर स्वप्नील लोखंडेनं पुण्यात काम करणार का? असं विचारलं असताना मी होकार दिल्यावर, त्याबदल्यात मला काय देशील? असं त्याने विचारलं. 
 
यावर मी कमिशन द्यायला तयार असताना त्याला काही वेगळंच हवं होतं हे कळलं. त्याला माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे होते आणि त्याबदल्यात तुला आणखी काम देईन असं त्याचं म्हणणं होतं. अभिनेत्री म्हणाली की हा प्रकार माझ्यासाठी धक्कादायक होता. अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करताना पहिल्यांदा असा वाईट अनुभव आल्यावर मी या संदर्भात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली.