शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (18:07 IST)

अग्गं बाई, सासूबाई! च्या आगामी भागात; आसावरी अनुभवतेय तिच्या पहिल्या कमाईचा आनंद!

अग्गं बाई, सासूबाई! च्या आगामी भागात, अभिजित राजे आणि आसावरी यांनी सुरु केलेल्या ‘अन्नपूर्णा’ मध्ये अनेकजण तिथल्या रुचकर अन्नाचा आस्वाद घेत आहेत. अभिजीत आणि असावरी त्यांच्या व्यवसायाचा पहिला दिवस असल्याने त्यासाठी पैसे घेण्याचा आग्रह करतात. त्यांचा मान ठेवत अभिजीत आणि असावरी ते पैसे घेतात. आसावरीने केलेली ही आयुष्यातील पहिली कमाई आहे आणि हा आनंद ती अभिजित राजे यांच्यासोबत शेअर करते.
 
अग्गं बाई, सासूबाई! मध्ये पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी, याचे प्रीमियर भाग झी 5 क्लबवर पाहता येतील.