बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified बुधवार, 9 डिसेंबर 2020 (14:01 IST)

मनोरंजन सृष्टीतला 'तेजस्वी' चेहरा

मनोरंजन सृष्टीत अनेक नवनवीन  कलाकार आपल्या अभिनयाची छाप सोडत प्रेक्षकांची मन जिंकत आहेत. त्याच कलाकारांमधली एक कलाकार म्हणजे तेजस्वी खताळ.
 
तेजस्वीची नवीन 'सनम हॉटलाइन 'हि वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या आधी तिने प्रियांका चोप्रा प्रोडक्शन सोबत 'काय रे रास्कला' या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. 'ओढ', 'खुलता कळी खुलेना' या मराठी चित्रपट आणि मालिकेत हि तिने काम केले. इथूनच तिच्या अभिनय आणि मनोरंजन सृष्टीच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. मनोरंजन सृष्टीत हुशार आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिची ओळख निर्माण झाली. त्यानंतर अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून नावारूपाला आलेल्या तेजस्वी खाताळची 'छोटी सरदारनी, 'ड्रीम ओव्हर' यासारख्या हिंदी, मराठी चित्रपट, मालिकांमधून कारकीर्द चालूच राहिली. प्रदीर्घ काळ मालिका, चित्रपट केल्यानंतर तिने आपला मोर्चा आता वेब सिरीज कडे वळवला आहे.
तिची हंगामा ओरिजनल ची 'सनम हॉटलाइन' हि वेब सिरीज येत्या ८ डिसेंबर ला प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यामध्ये तिने पहिल्यांदाच हॉट आणि नकारात्मक भूमिका साकारली आहे. लॉकडाऊन मध्ये कंटाळलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा विडा तेजस्वीनीने उचलल्याचे दिसून येत आहे.
 
तेजस्वी सनम हॉटलाईन बद्द्ल सांगताना म्हणते की, अभिनय आणि माझं अगदी महाविद्यालयीन शिक्षणापासूनच घट्ट नातं. मी माझ्या यशाचं खर श्रेय माझ्या कुटूंबाला देवू इच्छिते, त्यानी मला खुप सपोर्ट केला म्हणुन मी ही भुमिका चोखपणे निभावु शकले. जेव्हा मला या वेब सिरीज बद्दल विचारण्यात आलं तेव्हा कथा ऐकल्यावर नकार देण्याचा काही प्रश्नच नव्हता. हि भूमिका माझ्यासाठी खूप आवाहनात्मक होती. कारण मी पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारणार होते, त्यामुळे एक क्षणभर ही विलंब न करता मी या प्रोजेक्टला होकार दिला.