मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 9 नोव्हेंबर 2020 (16:49 IST)

चमकदार त्वचेसाठी हा स्क्रब वापरून बघा

आपल्या चेहऱ्यावरील चमक हळू-हळू कमी होत आहे. तर काळजी नसावी. आम्ही आपल्याला काही घरगुती स्क्रब बद्दल सांगत आहोत ज्यांना वापरून आपण आपल्या चेहऱ्यावरील चमक परत मिळवू शकता. चला तर मग वेळ न गमावता जाणून घेऊ या की आपण घरगुती स्क्रब कसा तयार करू शकता. 
 
1 साखर आणि लिंबू - 
1 चमचा साखर घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. आता हळुवार हाताने याला आपल्या चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ स्क्रब करून आपल्या चेहऱ्याला धुऊन घ्या. 
 
2 संत्राच्या सालीचे स्क्रब -
संत्र्याची साल आपल्या त्वचेचे तजेलपणा आणण्यासाठी उपयुक्त आहे. या साठी आपल्याला संत्रांच्या सालीला वाळवून वाटून भुकटी करायची आहे. या भुकटीमध्ये थोडंसं कच्च दूध मिसळून आपण चेहऱ्यावर लावू शकता. संत्राच्या सालाची भुकटी किंवा पावडर चांगले स्क्रब म्हणून काम करतं.
 
3 तांदुळाच्या पिठाचे स्क्रब -
तांदळाचं पीठ आणि दही समप्रमाणात मिसळून घ्या. आता याला चेहऱ्यावर लावून हळुवार हाताने मॉलिश करा आणि काही वेळ तसेच ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
 
4 बेकिंग सोडा स्क्रब -
 आपल्याला घरच्याघरी आपल्या चेहऱ्याला उजळवायचे असल्यास 2 मोठे चमचे बेकिंग सोडा, 1 लहान चमचा दालचिनी पूड, अर्धा लिंबाचा रस आणि मध मिसळा. या पेस्टला आपल्या त्वचेवर 5 मिनिटे लावा. लक्षात ठेवा की आपल्याला या पेस्टचा वापर आठवड्यातून 2 वेळा पेक्षा जास्त करू नये.