मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020 (13:22 IST)

चेहऱ्याचे डाग काढण्यासाठी आणि त्वचा तजेल करण्यासाठी नारळाचं तेल वापरून बघा

नारळाच्या तेलात लिनोलेनिक एसिड, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन एफ च्या सह अँटी बेक्टेरियल, अँटीऑक्सीडेन्टचे गुणधर्म आढळतात. जे आपल्या त्वचेशी निगडित प्रत्येक समस्यांपासून मुक्त करतं. चेहऱ्यावरील डाग काढण्यासाठी आणि त्वचा तजेल करण्यासाठी मदत करतं. 
 
अश्या प्रकारे वापरावं
आजच्या काळात प्रत्येक जण आपापल्या कामात इतका व्यस्त झाला आहे की आपल्या आरोग्यासह त्वचेची देखील अजिबात काळजी घेत नाही. या कारणास्तव वयाच्या 30 व्या वर्षी, चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक अदृश्य होते. अश्या परिस्थितीत आपण चेहऱ्यावरील चमक मिळविण्यासाठी बाजारपेठेतून विविध उत्पादने आणतो. ज्यामुळे आपला चेहरा खराब होतो. अश्या परिस्थितीत आपण महागड्या उत्पादनावर पैसे खर्च न करता घरात असलेल्या वस्तूंचा वापर करून नैसर्गिक तजेलपणा सह निरोगी त्वचा मिळवू शकता.
 
नारळाच्या तेलामध्ये लिनोलेनिक एसिड व्हिटॅमिन ई, आणि व्हिटॅमिन एफ सह अँटी बेक्टेरियल आणि अँटी ऑक्सीडेन्ट गुणधर्म आढळतात. जे आपल्या त्वचेसंबंधी प्रत्येक समस्येपासून आपल्याला मुक्त करतात. तसेच, हळद देखील त्वचेसाठी चांगली असते. जी आपल्याला डाग, मुरूम, फ्रीकल्ससह अनेक समस्यांपासून मुक्त करते. 

अश्याप्रकारे लावा नारळ तेलाने बनलेला फेस पॅक -
दोन मोठे चमचे नारळाचं तेल, एक मोठा चमचा मध, एक मोठा चमचा दूध आणि अर्धा चमचा हळद घालून चांगल्या प्रकारे मिसळून त्याची पेस्ट बनवा. या पेस्टला आपल्या चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे लावून ठेवा. सुमारे 20 ते 25 मिनिटे चेहऱ्यावर तसेच लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. नंतर मॉइश्चरायझर लावा.
 
सीरम म्हणून वापरा -
रात्री झोपण्याच्या पूर्वी नारळाच्या तेलाला चेहऱ्यावर लावू शकता. या साठी थोडंसं नारळाचं तेल हातात घेउन चोळून घ्या जेणे करून ते चांगल्या प्रकारे मिसळून जाईल. नंतर याला आपल्या चेहऱ्या आणि मानेवर चांगल्या प्रकारे हळुवार हाताने मसाज करा. चेहऱ्यावर जास्त प्रमाणात तेल असल्यास कापसाच्या साहाय्याने काढून टाका. रात्रीला असेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.