आपली विचारसरणी नकारात्मक का होते जाणून घ्या

Last Modified शनिवार, 5 डिसेंबर 2020 (09:13 IST)
सध्याच्या काळात बहुतेक लोकांची विचारसरणी नकारात्मक होत आहे. या मागे बरेच राजकीय, सामाजिक आणि बदलणारी जीवनशैली कारणीभूत असू शकते. असे देखील असू शकते की एखादी व्यक्ती लहानपणापासूनच चुकीच्या लोकांसह राहते. किंवा नंतर त्याची चुकीच्या लोकांशी मैत्री झाली असल्यास तरी ही. कधी-कधी चित्रपट, वेबमालिका किंवा साहित्याची पुस्तके देखील विचारसरणी खराब करतात. अशा प्रकारे विचार केला तर या नकारात्मक विचारसरणी होण्यासाठीची अनेक कारणे असू शकतात. चला या मागील मानसिक कारणे जाणून घेऊ या.
* आंतरिक आणि बाह्य -
शास्त्रज्ञ म्हणतात की मानवी मेंदूत सुमारे 24 तास हजारो विचार येतात. त्यामधील बहुतेक नकारात्मक असतात. जेव्हा आपण एखाद्यी नकारात्मक घटना बघतो त्या मध्ये भीती, राग, द्वेष, लैंगिक दृश्य असल्यास त्या घटनेची छवी किंवा त्या घटनेचे विचार आपल्या मनाच्या अंतःकरणात जातात, तर चांगल्या गोष्टी आपल्या मनाच्या बाह्य स्मृतीतच फिरून फिरून संपतात.

मेमरीचे किंवा स्मृतीचे दोन प्रकार आहेत -अंतर्गत आणि बाह्य. अंतर्गत मेमरी मध्ये साचलेला डेटा किंवा विचारांचा आपल्या मेंदूवर सखोल परिणाम होतो. त्या मुळे तो डेटा कधी ही पुसला जात नाही. रात्री झोपताना आपली अंतर्गत मेमरी सक्रिय असते सकाळी उठल्यावर देखील अंतर्गत मेमरी जागी असते. आपल्या अंतर्गत मेमरी म्हणजे मनातून नको असलेले नकारात्मक विचार काढा आणि आरोग्य, यश, आनंद आणि शांततेकडे एक पाऊल वाढवा.
लहानपणीच्या त्याच गोष्टी आपल्याला आठवतात ज्यात आपल्याला शिक्षा झालेली होती किंवा एखादी वाईट घटना घडलेली होती. हे देखील शक्य आहे की आपण खाद्या गोष्टीसाठी आपल्या पालकांकडे हट्ट केल्यावरच आपल्याला ती मिळाली होती.तर अशा गोष्टी आठवणीत राहतात. वास्तविक, आपले मन दुखी आणि वाईट गोष्टी स्वीकारण्यात अजिबात वेळ लावत नाही पण चांगल्या गोष्टी स्वीकारायला विसरच पडतो.

* घटनांचा परिणाम होतो -
म्हणून जगामध्ये युद्धाबद्दल तर सगळेच बोलतात आणि इतिहास देखील युद्धाच्या कथांनी परिपूर्ण आहे. परंतु हे फार कमी लोकांना माहित आहे की इतिहासाच्या युद्धात प्रेमाच्या व्यतिरिक्त बरेच काही घडते. एखादी व्यक्ती कशी आनंदी होते आणि सकारात्मक होते हे फार क्वचितच वाचले जाते.

शास्त्रज्ञ म्हणतात की आपले मन दिवस आणि रात्रीच्या विशिष्ट वेळी इतर वेळेपेक्षा अधिक ग्राह्य करण्याची क्षमता ठेवतो. या शिवाय आपले मन अधिक सक्रिय तेव्हा होत जेव्हा काही संकट येतात किंवा आनंदाच्या गोष्टी घडतात. जसे की सध्याच्या काळात लॉक डाऊन लागलेले असताना संपूर्ण देशाची चेतना जागृत झाली होती की आता काय होणार.

कोरोनाचा काळ हा संकटाचा काळ आहे तर याची आठवण बऱ्याच काळ राहणार. अशा प्रकारे जेव्हा दोन देशांच्या मध्ये युद्ध होतात तेव्हा देखील सर्वांची चेतना जागृत होते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रत्येक मोठ्या घडणाऱ्या घटनांचा परिणाम आपल्या मनावर होतो.

* एखादी व्यक्ती दुखी आणि आजारी कशी होते -
जे विचार सतत मनात येतात ती धारणा बनून जाते. म्हणजे ती गोष्ट आपल्या अंतर्गत मेमरीत जाते. जर आपल्या अवती भवती वाईट घटना घडत असतील आणि आपण त्याच गोष्टींना पुन्हा-पुन्हा आठवता तर ती धारणा बनून मनातच रुतून बसते. म्हणून वाईट विचारांना किंवा घटनेला पुन्हा-पुन्हा लक्षात ठेवू नये.
विचारच वस्तू बनतात. याचा अर्थ आहे की आपण जसा विचार करतो आपले भविष्य देखील तसेच तयार होत. जर आपल्याला आपल्या आरोग्याबद्दल भीती आहे किंवा आपण आपल्या यशावर संशय करता,आपण आत्मविश्वास गमावून बसला आहात तर समजावं की मन आजारी झाले आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात वाईट घटना वारंवार सामोरी आल्या तर त्याचे साधे-सोपे कारण असे की ती व्यक्ती आपल्या भूतकाळाबद्दल खूप विचार करते. बरेच लोक घाबरतात की मला हा आजार तर होणार नाही किंवा माझ्या बरोबर असे झाले तर...म्हणून अति विचार करणे टाळा, विचार करा तो केवळ वर्तमानाला सुधारण्या बद्दलचा.
* हे शक्य कसे होणार -
योगाचे तीन अंग आहे. ईश्वर प्राणिधान,स्वाध्याय आणि धारणा. यानेच हे शक्य आहे. जसे की आपल्याला माहीतच आहे की मेमरी दोन प्रकारची आहे अंतर्गत आणि बाह्य. अंतर्गत मेमरी रात्री झोपताना देखील सक्रिय असते आणि सकाळी उठे पर्यंत सक्रिय राहते. त्यावेळी ती दैनंदिनी घटनांना, विचारांना आणि इतर महत्त्वपूर्ण घटनांना लक्षात ठेवण्याचे काम करते. म्हणून सर्व धर्मांनी देवाच्या प्रार्थनेची ही वेळ निश्चित केली आहे. जेणे करून आपण हाच विचार करून झोपावे की जे आहे ते चांगलेच आहे आणि उठल्यावर देखील हाच विचार करा की जे होणार ते देखील चांगलेच होणार. म्हणून योगात 'ईश्वर प्राणिधानचे महत्त्व आहे.
संधीकाळ म्हणजे ज्यावेळी सूर्य उगवणार असतो आणि सूर्यास्त होणार असतो ही वेळ संधीकाळाची असते - अशा प्रकारे दिवस आणि रात्र मिळवून एकूण 8 संधीकाळ असतात. त्या वेळी हिंदू धर्मात आणि योगात संध्यावंदनाचे महत्त्व आहे. म्हणून सकाळ आणि संध्याकाळचा संधीकाळ सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. ज्या वेळी आपली अंतर्गत मेमरी सक्रिय असते. अशा वेळी पक्षी आपल्या घरट्याकडे जातात. .. संध्यावंदन करताना चांगले विचार करावे. जसे की मला निरोगी राहायचे आहे.
* ईश्वर प्राणिधान -
फक्त एकच ईश्वर किंवा परब्रह्म आहे या शिवाय इतर कोणी ही दुसरे देव नाही. ईश्वर किंवा देव हे निराकार आहे. हे एकमेव सत्य आहे. ईश्वर प्राणिधान म्हणजे, ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवणं, त्यांची भक्ती करणं. फक्त देवालाच मानणे इतर कोणी देवी, देव पीर, गुरु नाही. एकाच देवावर विश्वास ठेवणाऱ्यांना किंवा एकाच देवावर भक्ती करणाऱ्यांच्या मनात चिकाटी येते. ही चिकाटीचं त्यांच्या यशस्वी होण्याला कारणीभूत असते. आनंद असो किंवा दुःख असो, त्याच्या साठी आपल्या मनातली भक्ती कमी करू नका. या मुळे आपल्या पंचेंद्रियां एक होतात आणि लक्ष साध्य करण्याचे सामर्थ्य वाढते. जी लोक आपले विश्वास बदलतात ते मनाने कमकुवत होतात. केवळ त्या भगवंतावर विश्वास ठेवा, या मुळे आपल्या विखुरलेल्या विचारसरणीला एक नवी दिशा मिळेल आणि आपली विचारसरणी एकाच दिशेला वाहू लागल्यावर ती धारणा बनेल आणि या साठी आपण आपल्या साठी नेहमी चांगला विचार करावा. ईश्वर आपली सर्व इच्छा पूर्ण करतील.
* स्वाध्याय - स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करणं आणि चांगल्या विचारांचा अभ्यास करणे आपण आपले ज्ञान, कर्म आणि वर्तनाचे पुनरावलोकन करताना असं काही वाचा ज्या मुळे आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो. तसेच आपल्याला या मुळे आनंद मिळतो. तर पुस्तकांना आपले मित्र बनवा. आपण आपल्या आयुष्याला नवे वळण देण्यासाठी लहान लहान संकल्प करू शकता. प्रतिज्ञा करा की मी आजपासून ते सर्व काही बदलेन जे बदलण्याचा विचार मी कधीपासून करीत होतो. चांगले विचार करणे आणि अनुभवणे स्वाध्यायाची पहिली अट आहे.
* धारणा - धारणेने इच्छित आरोग्य, आनंद आणि यश मिळवा. जे विचार कळत-नकळत घट्ट होऊ लागतात ते धारणेची रूप घेतात. हे देखील श्वासोच्छ्वासाच्या हळू आणि शांत होण्यावर, इंद्रियांच्या विषयांमधून निघाल्यावर,मन स्वतःच शरीराच्या एका विशिष्ट ठिकाणी स्थिर होतो,तेव्हा ऊर्जेचा प्रवाह देखील त्याच दिशेने होतो. अशाने मनाची शक्ती वाढते. मन जे विचार करतं तसे घडू लागतं. जी लोक दृढनिश्चयी असतात, अनवधानाने त्यांची धारणा देखील पुष्ट होऊ लागते.


यावर अधिक वाचा :

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'
केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप ...

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय
पीएम मोदींनी पुन्हा एकदा जगात एक जबरदस्त विजय मिळवला आहे. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का?
यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर, यूकेतील 12 ते 15 वर्षं वयोगटातील ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ हे 'महिला विरोधी' आणि 'हिंदू ...

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम
कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ...

सोनाली नवांगुळ यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

सोनाली नवांगुळ यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
सोनाली नवांगुळ यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘मध्यरात्रीनंतरचे ...

प्रेम कविता : नजरेआड तुला होऊच देऊ नये, असं वाटायचं

प्रेम कविता : नजरेआड तुला होऊच देऊ नये, असं वाटायचं
लोपल डोळ्यांतल प्रेम जे तुझ्यासाठी होतं, नुसती ओळख उरली होती,असच वाटत होतं!

जागतिक सफरचंद खाण्याचा दिवस विशेष 2021 :दररोज सफरचंद खा ...

जागतिक सफरचंद खाण्याचा दिवस विशेष 2021 :दररोज सफरचंद खा ,आजाराला पळवा
गडद लालरंगाचे आंबट गोड चवीचे हे फळ आरोग्यासाठी अत्यन्त फायदेशीर आहे.हे वेगवेगळ्या ...

ओसीडी मंत्रचळ : तुम्ही सतत हात धुता का? एखाद्या गोष्टीमुळे ...

ओसीडी मंत्रचळ : तुम्ही सतत हात धुता का? एखाद्या गोष्टीमुळे त्रास होईल अशी भीती वाटते का?
हात धुणे, घर, शरीर एका मर्यादेपलिकडे तेही सतत स्वच्छ करत राहाणे, एखाद्या गोष्टीचा निश्चित ...

सर्दी पडसाचा त्रास असल्यास हे 5 घरगुती उपाय अवलंबवा

सर्दी पडसाचा त्रास असल्यास हे 5 घरगुती उपाय अवलंबवा
चोंदलेले नाक,घसा खवखवणे,खोकला !ही लक्षणे कोरोनाच्या कालावधीत आढळल्यावर घाबरायला होत. खरं ...