दीप पुजनासाठी पटकन तयार होणारे गूळ घालून बनवलेले गव्हाच्या पिठाचे दिवे
गुळ घालून दिवे (kankeche god dive) खायला अप्रितम लागतात.
साहित्य:
कणिक (गव्हाचे पीठ) - २ वाट्या
गूळ - १ वाटी
पाणी - १/२ वाटी
तूप - १-२ चमचे
वेलची पावडर - १/४ चमचा
जायफळ पावडर - १/४ चमचा
कृती:
एका पातेल्यात पाणी आणि गूळ घालून गरम करा. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत उकळवा आणि मिश्रण थंड होऊ द्या.
एका परातीत कणिक, रवा, मीठ, वेलची आणि जायफळ पावडर एकत्र करून घ्या. त्यात थंड झालेला गुळाचा पाक आणि तूप घालून घट्ट गोळा मळून घ्या.
मळलेल्या पिठाचे छोटे गोळे तयार करा आणि त्यांना दिव्याचा आकार द्या.
स्टीमर किंवा मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा.
इडलीच्या साच्यांना किंवा ताटलीला तुपाचा हात लावून घ्या.
त्यावर दिवे वाफवायला ठेवा.
पंधरा मिनिटे वाफवून घ्या.
नंतर तूप घालून प्रसाद ग्रहण करा.
विशेष टीप्स: गुळाचा पाक करताना तो जास्त घट्ट नसावा.
पिठाचा गोळा जास्त घट्ट किंवा पातळ नसावा.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेलची आणि जायफळ पावडर वापरू शकता.