गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 डिसेंबर 2020 (17:42 IST)

हिवाळ्यात च्यवनप्राशचे सेवन करा, आजार पळवा

च्यवनप्राशचे सेवन आरोग्यास चांगलं असत, पण विशेषतः हिवाळ्यात हे खूपच फायदेशीर असत. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींना मिसळून हे बनवलेले च्यवनप्राश आपल्याला बऱ्याच रोगांपासून वाचवत आणि निरोगी ठेवतं. जाणून घेऊ या च्यवनप्राशचे हे 10 गुण.
 
1 हिवाळ्याच्या दिवसात च्यवनप्राशचे सेवन केल्यानं शरीरात उष्णता निर्माण करून थंडी च्या दुष्परिणामां पासून वाचवत.या शिवाय च्यवनप्राश खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढते. तसेच आजार देखील लांब राहतात.
 
2 सर्दी,खोकला, फ्लू, कफ झाल्यास ह्याचे सेवन करणं फायदेशीर आहे. दररोज सकाळ आणि संध्याकाळी च्यवनप्राश खाल्ल्यानं हिवाळ्यात होणारे आजार उद्भवत नाही.
 
3 पचनाशी निगडित समस्यांमध्ये च्यवनप्राश खूप फायदेशीर आहे, हे दररोज खाल्ल्याने पचनाशी निगडित सर्व त्रास नाहीसे होतात आणि पचन प्रणाली बळकट होते.
 
4 च्यवनप्राश मध्ये आवळा आणि इतर औषधी वनस्पती असतात, जी आपल्या शरीरास व्हिटॅमिन्स आणि खनिजे देतात. या मुळे आपल्या क्रियाकलापांमध्ये तसेच लैंगिक सामर्थ्यात देखील वाढ होते.
 
5 जर आपले केस पांढरे झाले आहेत, तर च्यवनप्राश खाणं आपल्यासाठी एक उत्तम उपाय आहे. दररोज च्यवनप्राश खाणं आपल्या पांढऱ्या होणाऱ्या केसांना काळे करण्याची क्षमता राखतो. या मुळे आपली नखे देखील बळकट होतात.
 
6 हिवाळ्यात खोकला होणं ही सामान्य बाब आहे, परंतु आपल्याला जुना खोकला असल्यास आपण च्यवनप्राश नक्की खा. हे आपल्या खोखल्याला पूर्णपणे बरं करेल. हे आपल्या हिमोग्लोबिनला देखील वाढविण्याचे काम करत.
 
7 लहान मुलांमध्ये होणारे त्रास देखील च्यवनप्राश खाल्ल्याने दूर होतात. हिवाळ्यात मुलं देखील आरोग्याशी निगडित त्रासाला सामोरी जातात. च्यवनप्राशचे नियमितपणे सेवन केल्यानं हे मुलांना आतून सामर्थ्य देत.
 
8 स्त्रियांसाठी देखील च्यवनप्राशचे सेवन करणं खूप फायदेशीर असत. जर मासिक पाळी नियमानं येत नसेल, तर च्यवनप्राशचे सेवन आपल्याला मासिक पाळीच्या समस्यांपासून दूर ठेवतात.
 
9 मुलं असो किंवा मोठे असो, च्यवनप्राशचे नियमितपणे सेवन केल्यानं मेंदूची क्रिया आणि एकाग्रता वाढते. या मुळे मानसिक ताण कमी होतो आणि मेंदू निरोगी राहतो.
 
10 हे शरीराच्या अंतर्गत अंगाची स्वच्छता करून हानिकारक घटक दूर करण्यात मदत करतं. या शिवाय हे रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास उपयुक्त असत.