कमी वेळात मेंदूला आराम देण्यासाठी उपाय

Last Modified बुधवार, 2 डिसेंबर 2020 (10:09 IST)
सध्याच्या धावपळीच्या काळात माणसाचे मेंदू आणि मन कधी अडकेल कळतच नाही. मग ते कुटुंब असो, व्यवसाय असो किंवा समाजात राहून आपल्या समोर आलेल्या अडचणी असो. आपण बऱ्याच गोष्टीत आपले मन आणि मेंदू लावतो. जर आपले मन आणि मेंदू अस्वस्थ असेल तर आपण केलेल्या कामाच्या

परिणामाची कल्पना सहजच करता येऊ शकते.
आपल्याला आपली कामे यशस्वी करण्यासाठी मेंदू आणि मन स्थिर आणि शांत असणे आवश्यक असते, कल्पना करा की आपले मेंदू शांत आणि स्थिर नसेल तर घेतलेले निर्णय कसे असणार? अर्थातच निर्णय चुकीचेच असणार. चुकीच्या निर्णयामुळे आपले आयुष्य अपयशी ठरत. त्यामुळे आपला आत्मविश्वास कोसळतो. मेंदूला ताण असल्यावर कॉर्टिसॉल नावाचे हार्मोन तयार होतात, जे आपल्या मेंदूसाठी हानिकारक असते.
आपल्या मनाला आणि मेंदूला शांत करण्याचे काही मार्ग जाणून घेऊ या.

* हर्बल चहा प्यावा किंवा च्युईंगगम वापरा-
असे म्हणतात की ज्यावेळी एखादा व्यक्ती तणावात असतो तो चहा अधिक पितो. आपण बऱ्याच लोकांना बघितले असणार.

ऑफिसात कामाचे ताण वाढल्यास लोक चहा पितात, आपण दुधाचा चहा न पिता हर्बल चहा वापरावा. हर्बल चहा प्यायल्याने या मधील घटक आपल्या शरीरातील विषारी पदार्थांना दूर करतात आणि आपल्या मेंदूला आराम देतात. जर आपण चहा पीत नसाल तर आपण च्युईंगगम वापरा. या मुळे आपल्या कॉर्टिसॉल हार्मोनची पातळी कमी होणार. तथापि, हे जास्तकाळ चावू नये काही मिनिटानंतर काढून फेकून द्यावे आणि तोंडाला आराम द्यावा.
* स्ट्रेचिंग करणे आणि
मालिश
करणे -
जर आपले मेंदू तणावात आहे, तर मालिश केल्याने आपल्याला त्वरितच आराम मिळू शकतो. अशा प्रकारे स्ट्रेचिंग देखील आपल्याला मदत करू शकेल.स्ट्रेचिंग आपण खुर्चीवर बसून किंवा पलंगावर बसून देखील करू शकता. या मुळे आपल्या स्नायूंना फार आराम मिळतो.

* योगा -
आजच्या काळात योगा भारतातच नव्हे तर जगभरात शरीर आणि मनाला शांत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. सध्या तर बऱ्याच कंपन्या कॉर्पोरेट योगासाठी खास प्रशिक्षक देखील हायर करत आहे.
या साठी आपण सकाळ संध्याकाळचं योगा करावं असे आवश्यक नाही. आपणास मेंदूला त्वरितच आराम द्यायचे असल्यास योगा करायला पाहिजे. या मध्ये ध्यान, प्राणायाम इत्यादी पद्धतींचा समावेश करू शकता.
* उन्हात फिरणे -
आपल्याला एखाद्या वातावरणाचे ताण येत असल्यास, तर पाच ते दहा मिनिटाचे वॉक घ्या. हे आपण एकटेच करावे, ते आपल्यासाठी योग्य असणार. ऊन देखील या साठी आपल्याला मदत करते आणि आपले मेंदू शांत ठेवते.

* ज्यूस पिणे किंवा डार्क चॉकलेट खाणे -
ज्यूस प्यायल्याने आपल्या मेंदूच्या लहरींना आराम मिळतो. विशेषतः आंबट फळांचे जसे की मोसंबी,संत्री,अननस या फळांचे सेवन करावे,या मुळे आपल्या मेंदूला त्वरितच आराम मिळतो. तसेच डार्क चॉकलेट खाल्ल्याने तणाव असलेल्या मेंदूमध्ये कॉर्टिसॉलची पातळी कमी होते.

* आवडीचे संगीत -
आपल्या गाण्यांच्या अमर्यादित यादीं मधून आपल्यासाठी काही निवडक गाणी निवडा, ज्यांच्या मुळे आपल्याला चांगले वाटेल. तणावाच्या काळात काही निवांत क्षण आपल्याला शांती आणि आराम देतात. काही काळ डोळे मिटून गाणी ऐकल्याने आपले ताण दूर होतात. खरे सांगायचे तर आपल्या मेंदूनेच आपले शरीर आणि इतर व्यवहार नियंत्रित होतात, म्हणून आपल्या मनावर आणि मेंदूवर जास्त ताण देणे टाळावे आणि वरील उपाय करून मेंदूला आराम द्यावा.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

98 किलो वजनाचा हा माणूस वजन कमी करून फिटनेस कोच बनला, जाणून ...

98 किलो वजनाचा हा माणूस वजन कमी करून फिटनेस कोच बनला, जाणून घ्या
आजच्या जीवनशैलीत आणि स्पर्धेच्या युगात लोक तणावाखाली राहणे अगदी सामान्य झाले आहे. त्याच ...

एकांतात अश्रु वाटे, मग ती वाहते!

एकांतात अश्रु वाटे, मग ती वाहते!
काहीतरी तुज सांगावं, म्हणून कागदावर लिहिलं, तू फक्त शब्दच वाचले, बाकी न तुज ...

Career Tips : बी फार्मसी मध्ये करिअर बनवा, पात्रता ...

Career Tips : बी फार्मसी मध्ये करिअर बनवा, पात्रता ,अभ्यासक्रम जाणून घ्या
गेल्या काही वर्षांपासून मेडिकल फार्मसी क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. फार्मसी ...

Maharashtra Police Bharti 2022 :महाराष्ट्र पोलीस मध्ये ...

Maharashtra Police Bharti 2022 :महाराष्ट्र पोलीस मध्ये सशस्त्र पोलीस दलात कॉन्स्टेबलची भरती
महाराष्ट्र पोलीस मध्ये सरकारी नोकऱ्या आहेत. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल (SRPF) मध्ये ...

Marriage Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी ...

Marriage Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो तुम्हाला भरभरून यश मिळो लग्नाच्या मनापासून हार्दिक ...