गुरूवार, 27 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : रविवार, 26 सप्टेंबर 2021 (12:53 IST)

भारताचे माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल यांच्या वडिलांचे निधन

Former Indian cricketer Parthiv Patel's father dies Marathi Cricket News Webdunia Marathi
टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल यांचे वडील अजयभाई बिपीनचंद्र पटेल यांचे रविवारी निधन झाले. पार्थिव पटेल यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. पार्थिव पटेलच्या वडिलांना ब्रेन हॅमरेजनंतर अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. टीम इंडियाकडून खेळण्या व्यतिरिक्त पार्थिव पटेल आयपीएलही खेळले. त्यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी मिळाल्यावर क्रिकेट जगत शोकात आहे.

त्यांनी ट्वीट करून ही बातमी दिली."अत्यंत दुखी मनाने आम्ही आमचे वडील अजयभाई बिपीनचंद्र पटेल यांच्या निधनाबद्दल कळवतो. 26 सप्टेंबर रोजी ते त्यांच्या शेवटच्या प्रवासाला निघाले. आम्ही आपल्याला विनंती करतो की त्यांना आपण आपल्या विचारात आणि प्रार्थनेत ठेवा. त्यांच्या आत्म्यास  शांती लाभो.' वर्ष 2019 मध्ये त्यांनी सोशल मीडियामध्ये वडिलांच्या वैद्यकीय स्थितीविषयी माहिती दिली.

पटेल यांनी ट्विट केले होते की ते ब्रेन हॅमरेजमुळे ग्रस्त आहेत. कृपया माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा. वयाच्या 17 व्या वर्षी पेटलने भारताच्या कसोटी सामान्य साठी पदार्पण केले. भारताकडून खेळणारे ते  सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक आहे. पार्थिव ने 2020 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.