1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
  4. Maharashtras Hasiyajatra writer Vijay Kumar Rakh passes away

हास्यजत्रा फेम कलाकाराचे अकस्मात निधन

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सृजन टीममधील लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन झाले आहे. अशी माहिती समोर आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार  'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  या अत्यंत लोकप्रिय मराठी कॉमेडी शोच्या सृजन टीममधील तरुण लेखक विजय कुमार राख यांचे बुधवारी रात्री भीषण अपघातात निधन झाले आहे. तारुण्यात त्यांच्या झालेल्या या अकाली जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वावर आणि हास्यजत्रेच्या टीमवर दुःखाचा डोंगर कोसळला असून 
आज ही दुःखद बातमी समोर आली. 
विजय कुमार राख हे स्वतः पडद्यावर अभिनय करत नसले, तरी प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या हास्यजत्रेच्या स्कीट्सचे आणि विनोदांचे ते मुख्य लेखक होते. तसेच हास्यजत्रेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली.  विजय कुमार राख हे मराठवाड्यातील होतकरू लेखक होते. त्यांना विनोदाची चांगली जाण होती आणि ग्रामीण जीवनाचे बारकावे उत्तम पकडता येत होते. हास्यजत्रेच्या लेखन टीममध्ये ते महत्त्वाचे योगदान देत होते. तारुण्यात झालेल्या या अकाली निधनाने संपूर्ण हास्यजत्रा टीम आणि मराठी मनोरंजन क्षेत्र शोकात बुडाले आहे. टीमने आणि सहकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विजय कुमार राख यांच्या अचानक जाण्याने मराठी रंगभूमी आणि विनोदी लेखन क्षेत्राचे कधीही भरून न निघणारे मोठे नुकसान झाले आहे.
 
पुढील लेख
बाबरीच्या जागेवर राम मंदिर उभारणीमुळे मुस्लिम मित्रांची माफी; स्वरा भास्कर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात!