suvichar

मृण्मयी प्रतिभा देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मन फकीरा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...

Updated: बुधवार, 19 फेब्रुवारी 2020 (11:44 IST)
 
‘मन फकीरा’ या रोमँटिक ड्रामाच्या गेल्या काही आठवड्यांमध्ये प्रदर्शित झालेल्या पोस्टर, टीझर आणि गाण्यांना मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आज प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरमधून आपल्याला दोन जोडप्यांमधील वेगळ्या व्यक्तीबद्दल असलेले प्रेम बघायला मिळत आहे. ‘प्रेम...आहे, नाही, बहुतेक, वगैरे...’ ही या सिनेमाची टॅगलाईन असून तिच्याबाबत उत्कंठा लागली असतानाच नव्याने प्रदर्शित झालेला ट्रेलर या टॅगलाईनबद्दल हलकासा खुलासा करतो. ‘एखाद्या माणसांवर आपलं प्रेम असतं, पण दुसऱ्या एका माणसाबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार होऊ शकतो’, ‘हळव्या हाताने सोडवलं तर सुटेलही कदाचित’ यांसारख्या दमदार संवादानी हा ट्रेलर आपलं लक्ष वेधतो.
 
प्रेमात पडलाय... लग्नासाठी स्थळ आलंय... लग्न ठरलं... लग्न झालंय... अशा प्रकारचा आशय या ट्रेलरमधून समोर येतो.  भूषण-रिया यांचे मराठमोळ्या ‘कांदापोहे’ पद्धतीने लग्न होते आणि त्यानंतर सगळे काही सुरळीत सुरु असताना एका रात्री या दोघांचेही भूतकाळ समोर येतात. हे दोघे या सर्व गोष्टीला कसे समजुतदारणे सामोरे जातात आणि पुढे नक्की काय निर्णय घेतात... हे पाहण्यासाठी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची वाट पहावी लागणार आहे. पण या ट्रेलरमधून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे, हे नक्की! 
 
चित्रपटाची दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाली की, ‘आजच्या युवकाच्या त्याच्या जोडीदाराबद्दलच्या संकल्पना या वेगळ्या आहेत. तो अधिक प्रॅक्टीकल आणि अधिक मॅच्युअर आहे. त्यांना नुसते आयुष्यभर राहणारे पती किंवा पत्नी नकोत तर खरा मित्र हवा आहे. आज प्रदर्शित झालेला ट्रेलर प्रेक्षकांना नक्की आवडेल याचीही मला खात्री आहे.” 
 
‘फ्रेम्स प्रॉडक्शन’ कंपनीचे हेमंत रूपरेल, रणजीत ठाकूर आणि ‘स्मिता फिल्म प्रॉडक्शन्स’ची प्रस्तुती असलेल्या ‘मन फकीरा’ या चित्रपटाची निर्मिती एस. एन. प्रॉडक्शन्स आणि स्मिता विनय गानु, नितीन प्रकाश वैद्य यांनी केली असून चित्रपटाची सहनिर्मिती तृप्ती कुलकर्णी यांची आहे.

सर्व पहा

'६ वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, पण...'; संजय दत्तच्या 'त्या' विधानाने महाराष्ट्रात राजकीय गदारोळ!

Bigg Boss 20: 'बिग बॉस'चा २०वा सीझन मध्ये मनोज तिवारी यांची मुलगी रीतीची एन्ट्री

'लस्ट स्टोरीज ३' ची घोषणा, या तारखेला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल

करण जोहर राधा-कृष्णाची कथा मोठ्या पडद्यावर आणणार; जाणून घ्या कोण करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन

ईशा देओल विनोदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार! अभिनेत्री दिसणार या चित्रपटात

सर्व पहा

प्रसिद्ध गायकाच्या वाहनावर गोळीबार

अभिनेत्रीच मराठी ऐकलंत का? राणी मुखर्जीच्या मराठी भाषणाने सर्वांची मने जिंकली

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

६२ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राणी मुखर्जी आणि प्रसाद ओक यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात आले

४४ शोजवरून ५,४२७ पर्यंत, 'हनुमान अंश'ने पाचव्या आठवड्यात नवा इतिहास रचला

पुढील लेख
Show comments