शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

'दिल दोस्ती दुनियादारी'ची ही खास जोडी विवाहबंधनात अडकली

'दिल दोस्ती दुनियादारी' आणि 'अमर फोटो स्टुडिओ' अशा अनेक मालिका आणि नाटकांत बरोबर काम केलेल्या सहकलाकार सखी गोखले आणि सुव्रत जोशी हे विवाह बंधनात अडकले. नेरळ येथील सगुणा बागेत विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात अगदी मोजके पाहुणे उपस्थित होते.
 
'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून ही जोडी प्रसिद्ध झाली होती. सखी ही दिवंगत अभिनेते मोहन गोखले आणि प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांची मुलगी आहे. अभिनयाबरोबरच फोटोग्राफीची तिला आवड आहे. इकडे सुव्रत जोशी याने नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा येथून अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. त्याला रंगभूमीवर काम करण्याची अत्यंत आवड आहे.
 
मागील काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. या सोहळ्यात 'दिल दोस्ती दुनियादारी' आणि 'अमर फोटो स्टुडिओ' ची टीम उपस्थि होती. यांच्या लग्नाचे पिक्स सोशल मीडिवावर देखील शेअर करण्यात आले आहे.