गुरूवार, 8 डिसेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

सर्वांची लाडकी आईआजी रोहिणी हट्टंगडी

रोहिणी अनंत ओक म्हणजे लग्नानंतर रोहिणी जयदेव हट्टंगडी या ज्येष्ठ अभिनेत्री आहे यांना परिचयाची गरज नाही. रंगभूमी आणि चित्रपटाद्वारे आपल्या अभिनयाच्या डंका दाखवणार्‍या रोहिणी यांचा जन्म दिल्लीत झाला असला तरी अभिनयाची सुरुवात मात्र पुण्याच्या भावे स्कूलपासून झाली. 
 
कुटुंबातूनच अभिनयाची आवड आली कारण त्यांचे आई, वडील आणि भाऊ तिघेही नट होते. या सर्वांनी मिळून केलेले नाटक गावगुंड. सुरुवातीच्या काळात पुण्याच्या स्कूलमध्ये नाटक, नाट्यस्पर्धा आणि औद्योगिक आस्थापने आयोजित करीत असलेल्या नाट्यप्रयोगात त्या भाग घेत होत्या.
 
बी.एस्‌सी. झाल्यावर त्यांची निवड दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेत अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी झाली. तीन वर्षाच्या त्यांनी विविध भाषांमधील नाटकांतून कामे केली. नंतर एन.एस.डी.चा अभ्यासक्रम पूर्ण करून त्या पुणे येथे आल्या.
 
जयदेव हट्टंगडी यांच्याशी विवाहबद्ध होऊन त्या रोहिणी हट्टंगडी झाल्या. जयदेव हट्टंगडी हे दिल्लीच्या एन.एस.डी.मध्ये दिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेत होते. त्या कामाची यादी भली मोठी आहे. अनेक नाटक आणि चित्रपटांमध्ये त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण भूमिका केल्या आहेत. अनेक पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत. आजही हिंदी- मराठी चित्रपट आणि मालिकेत त्या दमदार भूमिका निभावतात आणि प्रेक्षकांचे मन जिंकून घेतात. आपल्या लाडक्या आईआजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...