सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मे 2020 (12:21 IST)

गँगस्टर अरुण गवळीच्या मुलीचं या अभिनेत्याशी लग्न

गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता व मराठी अभिनेता अक्षय वाघमारे ८ मे रोजी विवाह बंधनात बंधणार आहे. मुंबई आणि पुणे पोलिसांची विशेष परवानगी घेऊन हे दोघं उद्या विवाहबद्ध होणार आहेत. हा विवाह सोहळा २९ मार्च रोजी पार पडणार होता. मात्र लॉकडाउनमुळे लग्न होऊ शकलं नाही. अक्षय आणि योगिता हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. 
 
एका खाजगी मीडियाशी संवाद साधताना अक्षय वाघमारे यांनी सांगितले की लग्नाच्या परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज केला होता आणि त्यांच्याकडून परवानगी मिळाली असून आम्ही ८ मे ही लग्नाची तारीख ठरवली. लग्नाची शॉपिंग आधीच झाल असल्यामुळे फारसा त्रास होणार नसल्याचे ते म्हणाले.
 
मुंबईतल्या दगडी चाळीतच हा विवाहसोहळा पार पडणार असून या लग्नाला अरुण गवळीसुद्धा उपस्थित राहणार आहे. अक्षयप्रमाणे या लग्नसोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले जातील, सॅनिटायझर आणि फेस मास्क उपस्थितांना दिले जातील. आहे. गुरुवारी हळदीचा कार्यक्रम पार पडणार असून शुक्रवारी संध्याकाळी लग्न होणार आहे.