सोमवार, 26 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 12 जानेवारी 2026 (15:02 IST)

मराठी बिग बॉसचा विजेता शिव ठाकरे अडकला लग्न बंधनात

Shiv Thackeray's wedding
Instagram shiv thackeray
2025 मध्ये बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलीवुडच्या अनेक कलाकारांनी लग्न करून आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. तर 2026 मध्ये अभिनेता बिगबॉस मराठी फेम शिव ठाकरे देखील लग्नाच्या वेडीत अडकला असून त्याने सोशल मीडियावर चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. त्याने लग्नाचे फोटो शेअर केले असून कोण आहे त्याची पत्नी खरचं शिव ठाकरेंचे लग्न झाले आहे की हा एखाद्या मालिकेचा भाग आहे. अशा चर्चा सुरु आहे. 
शिव ठाकरे ने इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत फायनली असे कॅप्शन दिले आहे. त्याच्या पोस्टवर मराठी हिंदी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. फोटो मध्ये शिवने मुंडावळ बांधल्या असून त्याची बायको पाठमोरी असून तिने शिवच्या खांद्यावर डोकं ठेवलं आहे. पण फोटोत त्याने बायकोचा चेहरा दाखवलेला नसल्यामूळे चर्चा सुरु आहे. 
हा फोटो बघून प्रेक्षक हा शिवाचा एखादा नवा  प्रोजेक्ट असावा असा अंदाज बांधला जात आहे. 
 फोटोमध्ये शिव आणि त्यांची पत्नी पारंपारिक महाराष्ट्रीयन पोशाखात दिसत आहेत. शिव अत्यंत देखणा दिसत आहे, तर त्याच्या शेजारी उभी असलेली वधू साधेपणा आणि शिष्टाचार दाखवते. पोस्ट येताच, कमेंट सेक्शन अभिनंदनाने भरून गेले. विनोदी अभिनेत्री भारती सिंगने विनोदाने लिहिले, "हे कधी झाले, भाऊ? अभिनंदन!", तर अभिनेत्री माही विजने लिहिले, "अभिनंदन!" विकास जैनसह अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या.
शिवच्या आधीच्या रिलेशनबद्दल बोलायचं झालं तर, बिग बॉसच्याच घरातील कंटेस्टंट अभिनेत्री वीणा जगताप आणि शिव ठाकरे रिलेशनशिपमध्ये होते. परतुं, काही कारणामुळे दोघांचं ब्रेकअप झालं. फोटो मधली ही कोण आहे. या फोटो मागचं खरं तर शिवच सांगू शकेल. अशी प्रेक्षकांना आशा आहे. 
Edited By - Priya Dixit