मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 डिसेंबर 2017 (11:23 IST)

प्रिया,अभय आणि 'गच्ची' ची तिकडी वायरल

आयुष्यातील सुखदुखाची साक्षीदार ठरलेली 'गच्ची' शहरातील प्रत्येक माणसासाठी खास असते.बालपणाच्या गोड आठवणींचा संच दडलेल्या या जागेची सर इतर कोणत्याही ठिकाणाला नाही. म्हणूनच तर, प्रत्येकांची पर्सनल स्पेस असलेली हि 'गच्ची', सिनेमाद्वारे लोकांच्या भेटीला येत आहे. लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्राॅडक्शन्स यांची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभय महाजन आणि प्रियाबापट यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर ट्रेलर लाँच करण्यात आले. मुंबईच्या भाऊगर्दीत उंचावर वसलेल्या अश्या अनेक 'गच्ची'पैकी एक असलेली ही मोकळी हवेशीर जागा, आपणास या ट्रेलरमधून पाहायला मिळते. शिवाय प्रियाबापट आणि अभय महाजन या सिनेमातील प्रमुख पात्रांमधील वादविवाददेखील यातून दिसून येतात. आयुष्यात उभ्या ठाकलेल्या बिकट परिस्थितीला आपापल्यापरीने सामोरे जाणा-या या दोघांचे, वैचारिक मतभेद यात पाहायला मिळत असून त्यातून फुलत जाणारी त्यांची मैत्रीदेखील आपणास दिसून येते. गच्चीवर अनावधाने भेटलेल्या या दोन अनोळखी व्यक्तिमत्वांची रंजक गोष्ट सिनेमाच्या ट्रेलरमधून लोकांसमोर येतो.नचिकेत सामंत दिग्दर्शित 'गच्ची' सिनेमाचा हा ट्रेलर पाहताना जितका रोमांचक दिसतो, तितकाच तो प्रेक्षकांना संभ्रमातदेखील टाकतो.
 
गच्ची आणि ती दोघे अशा त्रिकोणात बनलेला या सिनेमाचा ट्रेलर अल्पावधीतच सोशल साईटवर चांगलाच गाजला असून, वेबसिरीजचा चेहरा म्हणून ओळख असलेल्या अभयला त्याच्या चाहत्यांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्राला अभिनय कौशल्ल्याने भूरळ पाडणारी अभिनेत्री प्रिया बापट, पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी घेउन येत आहे.