मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 17 एप्रिल 2019 (10:18 IST)

चित्तथरारक 'जजमेंट'

ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शंस निर्मित 'जजमेंट' या थरारक चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या  चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. २० सेकंदाच्या या टिझरमध्ये मंगेश देसाई, तेजश्री प्रधान आणि माधव अभ्यंकर यांची झलक दिसते. 'माझ्या जीवाला धोका आहे इथे', रडवेल्या आवाजात ऐकू येणारा हा संवाद आणि मंगेश देसाई यांचे कधीही न पाहिलेले रूप चित्रपटाबद्दलचे कुतूहल अधिकच वाढवत आहेत. शिवाय या चित्रपटामध्ये मंगेश देसाई प्रथमच खलनायकाची भूमिका करत असल्यामुळे त्यांच्या अभिनयाची आजपर्यंत कधीही न पाहिलेली एक वेगळी बाजू रसिकांना पाहायला मिळणार आहे.
हा चित्रपट नीला सत्यनारायण यांच्या 'ऋण' या कादंबरीवर आधारित आहे. निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण ह्यांची ओळख आहे.
 
या चित्रपटाचे निर्माता डॉ. प्रल्हाद खंदारे आणि सह निर्माता हर्षमोहन कृष्णात्रेय आहे. समीर रमेश सुर्वे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.