मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (14:27 IST)

एडनबर्गमध्ये पूजाची 'लपाछपी' ठरली लक्षणीय

चाकोरीबद्ध सिनेमातून बाहेर पडत मराठी चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मोहोर उमटवली आहे. मराठी कलाकारांनी देखील आपल्या अभिनय कौशल्यावर स्वतःला सिद्ध करत अनेक अंतरराष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव नोंदवले आहे. मराठीची गुणी अभिनेत्री पूजा सावंतच्या कामगिरीचादेखील यात आवर्जून उल्लेख करता येईल. नुकत्याच झालेल्या एडनबर्ग फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिला 'लपाछपी' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. याच फेस्टिव्हलमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांनाही 'लपाछपी'तल्या भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री' हा पुरस्कार मिळाला आहे. 
 
वाईल्ड एलीफंट मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अरुणा भट व सुर्यवीरसिंग भुल्लर  प्रस्तुत आणि मिडास टच मुव्हीजचे जितेंद्र पाटील व मीना पाटील निर्मित तसेच मुसिक फिल्म्सचे रणजीत रामप्रकाश सहनिर्मित या सिनेमाने यापूर्वीदेखील अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये मोलाची कामगिरी केली आहे. गेल्या जुलै महिन्यात महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आपला थरार आजही कायम राखत हॉररपटाचा नवा आयाम मराठी सिनेसृष्टीत रुजू केला आहे.
  
एडनबर्गमध्ये गाजलेल्या 'लपाछपी' सिनेमातील लक्षणीय भूमिकेबद्दल मिळालेला हा पुरस्कार स्वीकारताना पूजाने 'लपाछपी' मधली भूमिकाच माझ्यासाठी खूप खास असल्याचे सांगितले. 'आठ महिन्याच्या गरोदर बाईची भूमिका यात मला साकारायची होती. ते माझ्यासाठी एक आव्हान होत. स्वतःच्या बाळाला वाचवणाऱ्या एका आईची हि गोष्ट असून, हि भूमिका मला मिळाली याबद्दल मी दिग्दर्शकांचे आणि निर्मात्यांचे आभार मानते' असे देखील ती पुढे म्हणाली.