गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 5 सप्टेंबर 2018 (09:23 IST)

'सविता दामोदर परांजपे' मोठा प्रतिसाद

‘सविता दामोदर परांजपे’चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केल्याचं पाहायला मिळालं आहे. या निमित्ताने बऱ्याच दिवसानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक उत्तम थरारपटाची निर्मिती झाल्याचं पाहायला मिळालं. चित्रपटाने पहिल्या दिवशी २१ लाख, दुसऱ्या दिवशी ३४ लाख, तर तिसऱ्या दिवशी ५२ लाख रुपयांची कमाई केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या चित्रपटाने तीन दिवसामध्ये एक कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. 
 
अभिनेता जॉन अब्राहम यांची पहिली मराठी चित्रपट निर्मिती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे- जोशी यांनी केलं आहे. या चित्रपटात सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका ‘जे.ए.एन्टरटेन्मेंट’आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’‘सविता दामोदर परांजपे’या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.सुबोध भावे, तृप्ती तोरडमल आणि राकेश बापट यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.