सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018 (16:03 IST)

मराठी नाटकांत काम करणार्‍या सर्व कलाकारांसाठी....

रंगदेवतेस विनम्र अभिवादन करुन मराठी नाटकांत काम करणारे सर्व कलाकारांसाठी हा लेख आहे. मुळात हा लेख त्यांना समर्पित करतो. तुम्ही म्हणाल आधीच का बरे अस समर्पित वगैरे कारण ही तसच आहे. लेखातून मला जाणवलेल त्याच स्ट्रगल मी इथे शब्दरुपी मांडत आहे.

मराठी कलाकार हा सुरुवातीच्या काळात किंवा आताही खुप स्ट्रगल करून पुढे आलेला असतो. त्याच दररोज जीवन ती सारी एकेका भुमिकेसाठीची धडपड दिवस रात्र नाटक शुटींग सर्व काही धावपडीच जीवन मग कधीतर उपाशी राहण्यापर्यंत हा मराठी कलाकार आपल आयुष्य ऱंगभुमीच्या सेवेत अर्पन करत असतो. नाटकात भुमिका नाही मिळाली तर छोट्यामोठ्या भुमिकेसाठी धडपड चालूच असते. नाटक सुरु झाल तरी किती दिवस काम मिळणार याचीही माहीती नसते. एका नाटकामागे बरीच मंडळी राबत असते. नाटक उभ करणही तेवढ फारस सोप काम नाही अऩ नाटक उभ राहीलच तरी ते चालेलच याची खात्री नसते.शासन अऩुदान जरी मिळत असल तरी ते अनुदानसाठी एकेक दोन दोन वर्ष फिराव लागत. नाटक कलाकारांची एवढी बिकट अवस्था आहे की त्यांच्याकडे बघवत नाही. ह्या रंगदेवतेच्या सेवेकर्यांना देव कुठली परिक्षा पाहतो कुणाच ठाऊक कधी त्यांना चांगले दिवस येतील?

पुणे ही सांस्कृतिक राजधानी असली तरी ह्या पुण्य भुमित बरेच कलाकार आपल जीवन रंगभुमिसाठी रंगभुमिच्या सेवेसाठी अर्पण करतात. एकेकाळी रंगमंच गाजवणारी मंडळी आज त्यांना एका वेळेची खाण्याची भ्रांत आहे.एक बाजूला बॉलीवूडमधील कलाकार करोडो रुपये कमवत आहेत तर दुसरी ही मराठी कलाकरांची दैनिय अवस्था आहे. मी अशा कलाकारांबद्दल बोलत आहे जी आजही खुपच म्हातारी झाली आहेत आणि कुठलच काही काम करु शकत नाही ह्या मंडळींनी एकेकाळी रंगमंच गाजवलाय. मी बालगंधर्वला बालगंधर्व च्या वार्षिक उत्सवासाठी गेलो होतो त्यावळेला बालगंधर्वपरिवाराने एका कलाकाराची दैनीय अवस्था बघून 50 हजारांची मदद केली होती मला ते त्यावेळच  दृष्य बघून खुपच भावूक झालो होतो.  तो कलाकार एका जिण्याच्या खाली राहत होता त्याच सर्व कुटूंब तीथ तेवढ्या जागेत राहत होत. त्याची ती संपूर्ण कहाणी ऐकून मलाही मदतीची इच्छा झाली होती.

शासनाकडूनही असल्या कलाकारांना मदत मिळायला हवी. नाटकांतील यशस्वी कलाकारांनी सेलिब्रीटींनी फंडींग करुन यांना मदत करायला हवी.कारण त्यांनी जर कलेची सेवा नसती केली तर काय झाल असतयाचा विचार करुनच अशाकलाकारांसाठी मदत करायला हवी.नवदीत कलाकारांना योग्य ते मार्गदर्शन मिळायला हव. त्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. फ्री सेमीनार घ्यायला हवेत. सिनेमा रजीस्टर नसला तरी ऑडिशन घेतली जातात.

नवदित नाट्यलेखनासाठी तरुणांना प्रोत्साहीत केल पाहीजे. जुनी नाटकांचे अभिवाचन होऊन त्या नुसार नवीन नाटकांची निर्मीती झाली पाहीजे. महाराष्र्टची ही नाट्य संस्कृती टिकवणे आपले कर्तव्य आहे. नाटकांतील कलाकारांच योग्य तो संन्मान राखला गेला पाहीजे. प्रबोधनपर नाटक आणि मनोरंजन होईल अशी  नाटक लिहीली पाहीजेत. बालगंधर्व सारख्या जुऩ्या नाट्य गृहांची काळजी आपली आहे.

- विरेंद्र सोनवणे