‘हे राम.. नथुराम’ हे नाटक आता बंद होणार
फारच मोठ्या प्रमाणत वादात राहिलेलं आणि गांधी हत्येवर असलेले नाटक आता बंद होणार आहे. गेले वीस वर्ष अनेक वादात अडकून ते सुरु होते. मात्र आता त्याची अधिकृत घोषणा शरद पोंक्षे यांनी केली आहे. यात अभिनेते शरद पोंक्षे यांची मुख्य भूमिका असलेलं ‘हे राम.. नथुराम’ हे नाटक आता बंद होणार आहे हे उघड झाले आहे.
येत्या फेब्रुवारी महिन्यात या वादग्रस्त नाटकाचे शेवटचे दहा प्रयोग होणार असून या नाटकाचे पुन्हा प्रयोग केले जाणार नाहीत, असे शरद पोंक्षेंनी फेसबुकवरुन जाहीर केले आहे. यामध्ये गेल्या २० वर्षात आधी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ आणि नंतर ‘हे राम..नथुराम...’ असा प्रवास जाहला आहे. वीस वर्षात नाटकाला प्रेक्षकांनीही गर्दी केली. मात्र त्याचवेळी वादांनीही घेरलं.
सुरुवातीपासूनच हे नाटक वादाच्या भोवऱ्यात सापडलं होते. आता त्या सर्व वादांवर पडदा पडणार आहे. नाटक बंद करण्याचे कारण सांगातना शरद पोंक्षे म्हणाले आहेत की हे नाटक बंद करण्याचं पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे माझे वाढलेले वय होय . जेव्हा गांधी हत्या केली तेव्हा नथुराम फासावर चढला तेव्हा त्याचे वय 39 होते आणि माझे वय आता 52 आहे. मी वयाच्या 52 वर्षांपर्यंत नथुरामची भूमिका खेचली. प्रेक्षकांवर एकप्रकारे लादली असे दिसणार आहे.या नाटकाच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल शरद पोंक्षे यांनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहीली.