शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 27 मार्च 2019 (14:57 IST)

'मिरांडा हाऊस'मधून साईंकितचे सिनेसृष्टीत पदार्पण

विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला साईंकित कामत आता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'मिरांडा हाऊस' या चित्रपटातून साईंकित मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. चित्रपटाच्या नावावरूनच हा रहस्यमय चित्रपट असणार हे नक्की. त्यामुळे या चित्रपटात साईंकितची नेमकी भूमिका काय असणार हे औस्तुक्याचे ठरणार आहे. आजवर साईंकितने सालस, समंजस तरीही वैविध्यपूर्ण अशा भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळे या भूमिकेतूनही त्याचे वेगळेपण प्रेक्षकांसमोर येणार, यात शंका नाही. या चित्रपटात साईंकितसोबत पल्लवी सुभाष, मिलिंद गुणाजी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 'मिरांडा हाऊस'च्या निमित्ताने मिलिंद गुणाजीसुद्धा बऱ्याच काळाने मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. 'अ रेनी डे', 'सावरिया.कॉम' आणि 'सावली' असे वैविध्यपूर्ण विषय हाताळणाऱ्या राजेंद्र तलाक यांनी 'मिरांडा हाऊस'चे दिग्दर्शन केले आहे. आयरिस प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती असलेला हा चित्रपट १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.