शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 19 नोव्हेंबर 2018 (08:19 IST)

'मुळशी पॅटर्न' सिनेमातील काही जण पोलीसांच्या ताब्यात

मुळशी पॅटर्न हा सिनेमा पुण्यातील मुळशी परिसरातील गुन्हेगारी विश्वावर आधारित आहे. चित्रपटातील काही प्रसंगात स्थानिक गुंडाच्याही भूमिका आहेत. या चित्रपटामुळे गुन्हेगारांचे उदात्तीकरण होत असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे शहर आणि मुळशी परिसरातील गुन्हेगारी स्वरूपाच्या हालचाली वाढण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी गुन्हेगारांची झाडाझडती सुरू केली आहे. काही सिन्स हे प्रत्यक्षात घडलेल्या घटना असल्याने या गुन्हेगारांना सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांना ताब्यात घेतले आहे. संदीप मोहोळ खून प्रकरणाचा खटला शिवाजीनगर न्यायालयात सुरू आहे. या खून प्रकरणातील आरोपी गणेश मारणे, अनिल खिलारे, इंद्रनील मिश्रा, रहीम शेख, संतोष लांडे, शरद विटकर, संजय कानगुडे, विजय कानगुडे, निलेश माझीरे आणि दत्ता काळभोर हे तारखेसाठी न्यायालयात गेले होते. त्यावेळी या सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.