बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

विहरीत पोहले म्हणून दोन मागसवर्गीय बालकांना नग्न करत जबर मारहाण

जातीच्या नावाने महाराष्ट्रात रोज नवीन गोष्ट घडते आहे. मात्र आता पुन्हा एकदा नवीन प्रकार समोर आला आहे. यामध्ये जळगाव येथील वीहिरीत पाेहल्यामुळे मागासवर्गीय समाजाच्या दोन अल्पवयीन मुलांना नग्न करून जबर मारहाण केल्याची घटना जामनेर तालुक्यातील वाकडी येथे घडली आहे. यामुळे पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. हा सर्व प्रकार पाहून  पीडित मुलाच्या आईच्या फिर्यादीवरून २ अाराेपींना अटक झाली आहे.  कोर्टाने त्यांची पाेलिस काेठडीत रवानगी केली. १० जून राेजी घडलेला हा प्रकार बुधवारी साेशल मीडियातून व्हायरल झाला आहे. यामुळे जात बाजूला असो मात्र हतबल बालकांना मारणे किती योग्य आहे असा प्रश्न निर्माण विचरला जात आहे.
 
हा प्रकार रविवारी वाकडी (ता. जामनेर) येथील ईश्वर बळवंत जोशी यांच्या शेतातील विहिरीत काही मुले पोहत होती. जाेशी व त्यांच्याकडे काम करत असलेले प्रल्हाद कैलास साेनवणे हे अाल्याचे पाहून मुले विहिरीतून बाहेर अाली होती.  मात्र हे सर्व पाहून  जोशी यांनी त्यांचे कपडे घेऊन पळणाऱ्या मुलांचा पाठलाग सुरू केला होता.  पळून दमलेल्या दाेन मुलांना त्यांनी रस्त्यात गाठले होते. शेतातील घरासमोर नग्नावस्थेत उभे करून सोनवणे याने मुलांना पट्ट्याने मारहाण केली व या घटनेचे चित्रण जाेशी यांनी माेबाइलमध्ये केले. भीतीपाेटी या मुलांनी अापल्या घरी हा प्रकार सांगितला नाही. मात्र मंगळवारी (ता. १२) या मारहाणीचे चित्रण व्हायरल झाले. मुलांच्या कुटुंबीयांनाही माहिती कळली. पीडित मुलाच्या अाईने पहूर पाेलिस ठाण्यात बुधवारी रात्री फिर्याद दिली. त्यावरून साेनवणे व जाेशीविराेधात अॅट्रॉसिटी, बाललैंगिक अत्याचार व आयटी अॅक्ट कलमांंतर्गत गुन्हे दाखल करण्यात अाले. या दाेघांना लगेचच अटकही करण्यात अाली आहे. एका बाजूला राष्ट्रीय स्वयंम सेवक संघ देश एक करू पाहत आहे तर दुसरीकडे हे प्रकार घडत आहेत,