रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

Mumbai Pune Mumbai 3 Trailer Review: गोड बातमी

मुंबई आणि पुण्याचं भांडण तर आपण दोनदा बघून त्याची भरपूर मजा घेतली आहे आता या प्रेमळ भांडणार्‍या प्रेमळ जोडप्याच्या घरी पाळणा हलणार आहे.
 
पहिल्या पार्टमध्ये नकळत मैत्री करून प्रेमात पडले आणि दुसर्‍या भागात नाही नाही म्हणत लग्नाच्या बेडीतही अडकले. आता लग्न झालं म्हटल्यावर काय? तोच एक प्रश्न? पाळणा कधी हलणार.... तर ही मजा घेऊन चित्रपटाचा तिसरा भाग पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे.
 
\
गौतम आणि गौरी म्हणजेच स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या जोडीला प्रेक्षकांना अगदी प्रेमाने स्वीकारले. आता यांच्या संसारात येणार्‍या गोंडस बाळाची चाहूल लागल्यावर घरात किती आनंद आणि मजा पाहायला मिळणार आहे ते ट्रेलरवरून अंदाज घेता येतो. नवीन पाहुणा येणार म्हटल्यावर मुंबई आणि पुण्याचे कुटुंब काय गडबड गोंधळ घालताय अशी मजेदार कहाणी तिसर्‍या भागात बघायला मिळेल.
 
सतिश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई- पुणे- मुंबई’ च्या दोन्ही चित्रपटांना महाराष्ट्रातच नव्हे तर देश आणि परदेशात देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. आणि तिसर्‍या भागाची उत्सुकता देखील लागली होती. 'मुंबई पुणे मुंबई-3' सिनेमा 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.