सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 16 एप्रिल 2023 (14:41 IST)

नागराज मंजुळेंनी केली नव्या चित्रपटाची घोषणा

Nagraj Manjule
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सैराट आणि फॅन्ड्री ,नाळ या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून हे  चित्रपट एकेकाळी खूप गाजले होते . सध्या मंजुळे 'घर बंदूक बिर्याणी या चित्रपटामुळे चर्चेत आले असून त्यांनी आपल्या आगामी  नव्या  चित्रपटाची  घोषणा केली आहे.हा चित्रपट एका महान खेळाडूचा बायोपिक असेल. नागराज मंजुळे यांच्या या चित्रपटाचे नाव 'खाशाबा' असं असणार असून हा चित्रपट 1952 मध्ये उन्हाळी ऑलम्पिक मध्ये भारतासाठी कांस्यपदक मिळवणारे फ्री स्टाईल कुस्तीपटू खाशाबा दादा साहेब जाधव यांच्या जीवनावर आधारित असणार.ते एका कार्यक्रमात कोल्हापूर येथे घर बंदूक बिर्याणी या चित्रपटाचे  प्रमोशन करताना सांगत होते.लवकरच खाशाबा हा चित्रपट प्रेक्षकांच्या  भेटीला  येणार असून त्यात  कोण  कलाकार मुख्य  भूमिकेत  असणार हे लवकरच  कळेल        
Edited By - Priya Dixit