आता ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप!
झी मराठी वर प्रेक्षकांच्या भेटीसाठी नवीन मालिका येत आहे. झी मराठीवर अलीकडेच 'दार उघड बये' ही मालिका सुरु झाली असून आता एक नवी मालिका येत आहे. ही मालिका स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर अभिनित तू तेव्हा तशी या मालिकेच्या वेळी येणार असल्याची बातमी आहे. त्यामुळे आता 'तू तेव्हा तशी' मालिका निरोप घेण्याचे वृत्त मिळत आहे. अद्याप या बाबतीत माहिती मिळाली नाही. या मालिकेची जागा 'ह्र्दयी प्रीत जागते' ही मालिका घेणार आहे. या मालिकेचं टायटल सॉंग देखील प्रदर्शित झालं असून नव्या मालिकेचं प्रोमो पाहून प्रेक्षकही क्रेझी झाले आहेत. ही मालिका म्युझिकल बेस असणार असून रिदमचा बादशाह आणि सुरांची राणी अशी जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.
ही मालिका येत्या 7 नोव्हेंबर रोजी सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे आता 8 वाजताची मालिका 'तू तेव्हा तशी' मालिका निरोप घेण्याची चर्चा सुरु आहे.
Edited By- Priya Dixit