शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (14:32 IST)

मराठमोळी अभिनेत्री बांधणार लग्नगाठ

shubhangi
Instagram
ससुराल सिमर का ही हिंदी मालिका खूपच लोकप्रिय झाली. या मालिकेमुळे शुभांगी तांबाळे हे नाव घरोघरी पोहोचले. ससुराल सिमर का या मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये शुभांगीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ही तिची पहिलीच हिंदी मालिका होती, त्यापूर्वी शुभांगीने मराठी मालिका, नाटकात काम केलं होतं. बॉइज 2 या सिनेमातही शुभांगीची खास भूमिका होती.  
 
नुकताच तिचा साखरपुडा झाला. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ससुराल सिमर का सीझन 2 या मालिकेतून आणि बॉइज 2 या सिनेमातून घराघरात पोहोचलेली शुभांगी तांबाळे हिनेही मित्र करण मेहताशी साखरपुडा केला आहे.
 
साखरपुड्याचे फोटो तिने नुकतेच तिच्या सोशलमीडियावर शेअर केले. तिने हिरव्या रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तर करणनेही हिरवा जोधपुरी सूटमध्ये सजला आहे. करण आणि शुभांगी अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांच्या मैत्रीतूनच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.