शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (15:23 IST)

मराठी अभिनेत्री शिवाली परबची ही वस्तू चोरीला गेली

मराठी अभिनेत्री असलेल्या शिवाली परबचा मोबाईल नुकताच चोरांनी लांबवल्याची घटना घडली आहे. कल्याण येथे राहणारी शिवाली शूटिंगसाठी निघाली होती. रिक्षाची वाट पाहत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या दोघांनी मोबाईल हिसकावत थेट धूम ठोकली आहे.
 
शिवाली परब ही मराठी अभिनेत्री आहे. मूळची सावंतवाडी – सिंधुदुर्ग येथील असलेली शिवाली सध्या कल्याण येथे राहते. शिवाली तिच्या विनोदी भूमिका, शैली आणि थप्पड कामगिरीसाठी अधिक प्रसिद्ध आहे. मालिकांपासून ते कॉमेडी शोपर्यंत, थिएटर नाटकांपासून चित्रपटांपर्यंत, शिवालीने मराठी आणि हिंदी शोमध्ये अभिनय केला आहे. सध्या ती सोनी मराठीवर प्रसारित होणाऱ्या ‘महाराष्ट्रची हास्यजत्रा’ मधील भूमिकेसाठी ओळखली जाते.
 
रविवारी सकाळी शिवाली शूटिंगसाठी मीरारोड येथे निघाली होती. तेव्हा पिंपळास फाटा येथे ती रिक्षाची वाट पाहत उभी होती. रिक्षा तिच्याजवळ येत असतानाच दुचाकीवर आलेल्या दोघांनी काही संजयच्या आतच तिच्या हातातील महागडा मोबाइल हातातून हिसकावून घेत तेथून पळ काढला. या प्रकारणी गोंधळलेल्या शिवालीने कोनगांव पोलीस ठाणे गाठत तिथे तक्रार दाखल केली आहे.