मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (15:43 IST)

शेतात नांगर चालवतांनाचा व्हिडीओ प्रवीण तरडे यांचा व्हिडीओ व्हायरल

pravin tarde
मराठी दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते प्रवीण तरडे हे त्यांच्या विशेष शैलीसाठी ओळखले जातात. ते नेहमीच सोशल मीडियावर एक्टिव असतात आणि आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात . त्यांनी आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून शेतात भात शेती ची लागवड करत शेत नांगरतानाचा व्हिडीओ फेसबुक अकाउंट वरून शेअर केला आहे.  प्रवीण तरडे यांचं आपल्या गावावर, आपल्या शेतीवर किती प्रेम आहे हे नव्याने सांगायची गरज नाही. अनेकदा ते आपल्या शेतात रमलेले पाहायला मिळतात. आताही प्रवीण तरडे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रवीण तरडे यांनी आपल्या हातात नांगर घेऊन भात शेतीची लागवड केली आहे. 
 


या व्हिडिओ प्रवीण तरडे स्वतः बैल जोडी घेऊन शेतात राबताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड  व्हायरल होत आहे.शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला बॅकग्राऊंड गाणं लावण्यात आले आहे. काळ्या मातीत मातीत तिफन चालते. 
 
तसेच त्यांनी आपल्या या व्हिडिओला दिलेलं कॅप्शन देखील काहीसे हटके आहे.”हा चिखल पायाला काय अख्ख्या अंगाला लागला तरी झटकला नाही जात… कारण आपल्या कित्येक पिढ्यांनी हा चिखल एखाद्या दागिन्यासारखा मिरवलाय आपणही मिरवू ..”अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिल आहे. सध्या प्रवीण तरडे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.