शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 ऑगस्ट 2022 (12:58 IST)

Video शेतात राबतायंत प्रवीण तरडे

pravin tarde
प्रवीण तरडे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. प्रवीण यांचा शेतात राबतानाचा व्हिडिओ समोर आला असून याने यूजर्सचं मन जिंकून घेतलं आहे. 
 
प्रवीण तरडे यांची ओळख लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशी असून या व्हिडिओत त्यांचा अंदाज एखाद्या रिअरल हिरो सारखा आहे. फेसबुकवर प्रवीण तरडे यांनी शेतात राबतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात 'काळ्या मातीत मातीत..' हे गाणं आणि बैलजोडी घेऊन प्रवीण तरडे शेतात दिसत. त्यांचा हा स्टाईल चाहत्यांना आवडला आहे.
 
व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं आहे की 'हा चिखल पायाला काय अख्ख्या अंगाला लागला तरी झटकला नाही जात. कारण आपल्या कैक पिढ्यांनी हा चिखल एखाद्या दागिन्यासारखा मिरवलाय आपणही मिरवू'. 
 
प्रवीण यांच्या या व्हिडिओवर खूप कमेंट्स येत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे प्रेक्षकांच्या जवळपास सर्वच कमेंट्सना प्रवीण यांनी रिप्लाय दिला आहे. 
 
प्रवीण यांनी काही दिवसांपूर्वी देखील असाच एक शेतातील व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ते भातलावणी करताना दिसले होते. तर त्यापूर्वी प्रवीण यांनी त्यांच्या वडिलांचा एक शेतातील व्हिडिओ देखील शेअर केला होता.