मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (13:47 IST)

Hridayi Vasant Phulatana :एव्हरग्रीन गाणं 'हृदयी वसंत फुलताना' नव्याने टकाटक-2 मधून प्रेक्षकांसमोर

अशी ही बनवाबनवी या अजरामर चित्रपटाचं नाव मराठी कला विश्वाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरलं  आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्षे झाली आहे तरी ही  हा चित्रपट आज देखील लोकप्रिय आहे. आज देखील या चित्रपटाचा आनंद प्रेक्षक मनापासून घेत असतात.या चित्रपटातील सर्वच  गाणी लोकप्रिय झाली असून या चित्रपटातील 'हृदयी वसंत फुलताना हे गाणं पुन्हा एकदा नव्या रूपातून प्रेक्षकांसमोर येत आहे. टकाटक 2  या आगामी चित्रपटात हे गाणं रिक्रिएट केलं जाणार आहे. हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर ,पोस्टर आणि टिझर ने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होत आता 18 ऑगस्ट रोजी अशी ही  बनवाबनवी चित्रपटातील या गाण्याचं नवं रूप कस असेल हे पाहण्याची उत्सुकता आहे. 

34 वर्षे लोटली तरीही रसिकांच्या मनातील या गाण्याचा बहर आजही ताजातवाना आहे. आजही हे गाणं तितकंच पॅाप्युलर आहे, जितकं पूर्वी होतं. तरुणाईही प्रेमात असलेलं हे गाणं टकाटक 2  मध्ये नव्या रूपानं झळकणार आहे. ईराणी-जर्मन मॅाडेल एलनाझ नौरोजीच्या ग्लॅमरचा स्पर्श 'हृदयी वसंत फुलताना...' या गाण्याला लाभला आहे. हे गाणं नव्या रूपात लाँच करण्यात आलं. निर्मात्यांनी अगोदर 90 सेकंदाचे गाणे  इश्तार म्युझिकच्या यू ट्यूब चॅनल आणि सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे.
'हृदयी वसंत फुलताना...' या गाण्याच्या तालावर एलनाझ मराठी रसिकांना ठेका धरायला लावणार आहे. 'टकाटक 2'मध्ये मुख्य भूमिका साकारणारे कलाकार प्रथमेश परब, प्रणाली भालेराव, अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, कोमल बोडखे या गाण्यात एलनाझच्या जोडीला झळकणार आहेत. गीतकार जय अत्रे यांनी या गाण्याचे पुर्नलेखन केलं असून, गायिका श्रुती राणेच्या आवाजात संगीतकार वरुण लिखते यांनी संगीत दिलं आहे. तर नृत्य दिग्दर्शन राहुल संजीर यांनी केलं आहे.