रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 ऑगस्ट 2022 (21:32 IST)

अभिनेत्री मृणाल ठाकूरचे धुळे शहराशी आहे खास नाते

mrunal thakur
छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री मृणाल ठाकूरने बॉलिवूडमध्ये आपली स्वतःची जागा निर्माण केली आहे. त्यामुळे तिचे नाव अल्पावधीतच लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट झाले आहे. ‘कुमकुम भाग्य’या मालिकेने खऱ्या अर्थाने मृणाल प्रसिद्धीच्या झोतात आलेली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर तिच्याशी संबंधित अनेक गोष्टींची चर्चा होत आहे. यापेक्षाही तिची वेगळी ओळख म्हणजे मृणालचे खान्देशी भाषेवरील प्रेम.
 
मृणाल ही मराठमोळी अभिनेत्री आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. बॉलीवूडमध्ये नशीब आजमावत असलेली मृणाल मराठी कुटुंबातील असून तिचे बालपण महाराष्ट्रात गेले. त्यामुळे मराठीवर तिचे विशेष प्रेम आहे. एवढेच नाही तर मराठी आणि खान्देशी भाषेवर तिचे विशेष प्रभुत्व आहे.
 
मृणाल मूळची धुळ्याची आहे. त्यामुळे तिचे खान्देशी भाषेवर विशेष प्रभुत्व आहे. हिंदी, इंग्रजी आणि मराठीसोबतच मृणाल खानदेशीही तितक्याच सहजतेने बोलते. मृणालला खान्देशी भाषा येत असल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. मृणालने कलाविश्वात आपले स्थान निर्माण केले आहे. ‘लव्ह सोनिया’,‘सुपर ३०’,‘बाटला हाऊस’,‘जर्सी’,‘सुराज्य’,‘विट्टी दांडू’अशा अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये ती दिसली आहे.