1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (19:49 IST)

दे धक्का २ आज सर्वत्र प्रदर्शित झाला

Amey Vinod Khopkar Entertainment and Skylink Entertainment presents 'De Dhakka 2'
अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत  'दे धक्का २'  हा चित्रपट आज सर्वत्र  प्रदर्शित झाला आहे . काही चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडत नाहीत तर चाहत्यांच्या मनावरही छाप पाडण्यात यशस्वी होतात असाच एक चित्रपट ‘दे धक्का’. या चित्रपटाला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले आणि आता या चित्रपटाचा सिक्वेल "दे धक्का २ " आज प्रदर्शित झाला आहे.
 
सुपरहिट 'दे धक्का ' २००८ साली प्रदर्शित झाला होता. अतुल काळे आणि सुदेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले होते. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, संजय खापरे आणि सक्षम कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट महाराष्ट्रातील एका खेडेगावातील एका वेड्या कुटुंबाच्या ऑटो-रिक्षामधील प्रवासाविषयी होता.
 
आता दे धक्का २ मध्ये ऑटो-रिक्षाची जागा कार ने घेतली आहे आणि चित्रपटाचे कथानक  लंडनमध्ये घडते. या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सक्षम कुलकर्णी , संजय खापरे तसेच सह कलाकार गौरी इंगवले, प्रवीण तरडे, विद्याधर जोशी आणि आनंद इंगळे हे आहेत .  
 
दे धक्का 2 चे दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केले आहे. महेश मांजरेकर यांनी कथा आणि पटकथा लिहिली आहे , संवाद लेखन गणेश मतकरी यांनी केले आहे. करण रावत हे सिनेमॅटोग्राफर आहेत तसेच चित्रपटाचे एडिटिंग सतीश पडवळ आणि नीलेश गावंड यांनी केले आहे.
 
दे धक्का २ मधील गाणी संगीतकार हितेश मोडक यांनी संगीतबद्ध केली आहेत तर गीतकार मंदार चोळकर आणि नेहा शितोळे हे आहेत.आघाडीचे गायक अवधूत गुप्ते, वैशाली माडे, शमिका भिडे, रिया भट्टाचार्य या चित्रपटाला लाभले आहे . सिनेमाचे संगीत 'व्हिडिओ पॅलेस' ने प्रदर्शित केले आहेत. 
 
'दे धक्का २' ची निर्मिती यतीन जाधव आणि स्वाती खोपकर यांनी केली आहे. निनाद नंदकुमार बत्तीन आणि तबरेझ पटेल यांनी सह निर्मिती केली आहे तसेच असोसिएट निर्माते कर्मिका टंडन आणि विशिष्टा दुसेजा हे आहेत .