संबंधित माहिती
- Dagadi Chawl 2- ह्या पावसाळ्यात कडकली 'दगडीचाळ २' ची वीज
- शेतात नांगर चालवतांनाचा व्हिडीओ प्रवीण तरडे यांचा व्हिडीओ व्हायरल
- Video शेतात राबतायंत प्रवीण तरडे
- Happy Birthday Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar: सचिन ‘नवरी मिळे नवऱ्याला’च्या सेटवर जमली जोडी, आज दोघांचा वाढदिवस
- Hridayi Vasant Phulatana :एव्हरग्रीन गाणं 'हृदयी वसंत फुलताना' नव्याने टकाटक-2 मधून प्रेक्षकांसमोर
थिएटर्समध्ये गाजला, OTT वर वाजला.. प्रसाद ओकने शेअर केली इन्स्टाग्राम पोस्ट
प्रसाद ओकचा धर्मवीर चित्रपट आणि त्यातील आनंद दिघे यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. नुकतचं झी मराठीवर धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर प्रसाद ओकने शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आहे. धर्मवीर हा सिनेमा13 मे 2022 ला महाराष्ट्रात रिलिज झाला. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे असं या सिनेमाचं नाव आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर आवडला आणि गाजला. महाराष्ट्रात सर्वत्र या सिनेमाची चर्चा झाली. हा सिनेमा धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सिनेमा प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओकने साकारली आहे. नुकताच हा सिनेमा झी मराठीवर दाखवण्यात आला. त्यानंतर प्रसाद ओकने इंस्टाग्रामवर केलेली पोस्ट चर्चेत आहे.
सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या प्रसाद ओकने धर्मवीरच्या टेलिव्हिजन प्रिमियरनंतर इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली. त्याने लिहिलं, “थिएटर्स मध्ये गाजला, OTT वर वाजला आणि काल झी मराठीवर तुमच्या प्रेमामुळे सजला… #धर्मवीर… पुन्हा एकदा इतके मेसेजेस आणि कॉल्स आलेत कालपासून, अभिनंदनाचे आणि कौतुकाचे की, असं वाटलं तुम्हा सगळ्या प्रेक्षकांनाच एकदा SALUTE करावा….!!!! असंच प्रेम कायम राहू द्या…!!!”
